महाराष्ट्र

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा

भारतीय संघर्ष.......

 

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, नवनवीन अभ्यासक्रम तसेच शैक्षणिक विषय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजून घेता यावेत, या उद्देशाने इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउन यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, सारडे येथे संगणक भेट देण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षा हेतल खोना, सचिव भारती विक्रमसी, क्लब मेंबर आशिता दावडा व मिनल शहा यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व नियोजनातून करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउनच्या अध्यक्षा हेतल खोना, सचिव भारती विक्रमसी, क्लब मेंबर आशिता दावडा व मिनल शहा, आकाश फाउंडेशन मुंबईच्या सचिव संजीवनी श्रृंगारे, सारडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका समृद्धी वऱ्हाडी, शिक्षिका अपूर्वा घरत, रश्मी पवार, वनिता पाटील, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, कृषी मित्र प्रकाश माळी, हॉटेल MDSचे मालक नितीन म्हात्रे, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जयेश म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक म्हात्रे, उपाध्यक्ष उज्वला पाटील, सदस्या पूनम पाटील, कविता म्हात्रे, मंगेश पाटील, मदतनीस ज्योत्स्ना पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षा हेतल खोना म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात दर्जेदार शिक्षण घेता यावे आणि आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, यासाठी इन्नर व्हील क्लब सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून आवश्यक ती मदत करणे आणि निःस्वार्थ भावनेने सेवा देणे, हा क्लबचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल शिक्षिका अपूर्वा घरत यांनी इन्नर व्हील क्लब ऑफ बॉम्बे डाउनटाउन, आकाश फाउंडेशन मुंबई, सारडे विकास मंच तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि भविष्यात प्रगती करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
संगणकाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला डिजिटल बळ मिळणार असून, सारडे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button