महाराष्ट्र

डोंबिवली स्थानिक संस्थेचा वृक्षदिंडी रॅली, रक्षाबंधन व स्कार्फ डे कार्यक्रम संपन्न….

भारतीय संघर्ष न्यूज....

कल्याण प्रतिनिधी,

श्री. प्रवीण खाडे सर……..

डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल इंटरनॅशनल स्कूल, डोंबिवली पूर्व येथे वृक्षरोपण, वृक्षदिंडी, रक्षाबंधन व स्कार्फ डे या उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, वृक्षसंरक्षण, बंधुभाव, सामाजिक बांधिलकी आणि शिस्त यांविषयी जागृती निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात मंजुनाथ विद्यालयाचे स्काऊट मास्टर श्री हरित मेहता व त्यांच्या स्काऊट व गाईड यांनी बँड पथकाने सलामी देऊन वृक्षदिंडी रॅलीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरणविषयक घोषवाक्यांचे फलक घेऊन उत्साहात सहभाग घेतला. “झाडे लावा, झाडे जगवा”, “वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा” अशा घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रॉयल इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष श्री वाणील शाह,मॅनेजिंग ट्रस्टी सौ पूजा शाह तसेच रॉयल इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. राखी सिंग, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे अध्यक्ष श्री जितेंद्र अग्रवाल,सौ अग्रवाल ,खजिनदार श्री रमेशजी खंडेलवाल, सचिव श्री महेंद्र भोईर,रो्ट्रीयन श्री दिनेश खरोटे, रो्ट्रीयन श्री प्रकाश शाह,जिल्हा संघटक स्काऊट श्री संदीप घुसिंगे सर , डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक जगताप सर,सचिव श्री जगदीश उगले, सल्लागार श्री नरेंद्र राणे सर, श्री सुनील भावसार सर, श्री राजेंद्र शेटे सर, श्री उदय नाईक सर,स्काऊट मास्टर श्री हरित मेहता सर , श्री सुनील पाटील सर, सौ निर्मला बागल मॅडम,श्री तुषार मोरे सर तसेच सर्व शाळेचे स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन उपस्थित होते.


सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती पूजन व लेडी बेडेन पॉवेल, बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉ.राखी सिंग मॅडम यांना सहाय्यक जिल्हा आयुक्त गाईड नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यातआला. मंजुनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा पंडित मॅडम यांना उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला . त्यानंतर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व शाळांचे स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन यांना तिरंगा रॅली व महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या लेझीमचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


त्यानंतर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या वतीने एका वृक्षाचे रोपण करण्यात आले.तसेच डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्था यांच्यावतीने एक वृक्षाचे रोपण करण्यात आले व रॉयल इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने एका वृक्षाचे रोपण करण्यात आले.
यानंतर रक्षाबंधनाचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधून प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला. तसेच पर्यावरणपूरक राख्यांचा वापर करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

स्कार्फ डे निमित्त उपस्थित शाळेतील 50 विद्यार्थ्यांना स्कार्फ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्काऊट-गाईडच्या शिस्तबद्ध वेशभूषेत स्कार्फ परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण झाली.

सर्व विद्यार्थी, शिक्षक, स्काऊट-गाईड प्रतिनिधी आणि आयोजकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना “पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे” हा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला. या कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील एकूण बारा शाळेतील 200 स्काऊट व गाईड यांनी सहभाग घेतला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अल्प उपहार देण्यात आला.
या उपक्रमासाठी रॉयल इंटरनॅशनल स्कूल, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच जिल्हा संघटक स्काऊट सन्माननीय श्री संदीप घुसिंगे सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व शाळेचे स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन हे वेळोवेळी स्थानिक संस्थेला कार्यक्रमासाठी सहकार्य करत असतात त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये रॉयल इंटरनॅशनल स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम अशी व्यवस्था व नियोजन केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे सेवानिवृत्त पदाधिकारी हे देखील वेळोवेळी कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. सर्व शाळेचे स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांनी या उपक्रमासाठी मनापासून खूप मेहनत केली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. मंजुनाथ विद्यालयाचे स्काऊट मास्टर श्री हरित मेहता यांनी आपल्या शाळेचे बँड पथक रॅलीसाठी आणून या कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रामनगर पोलीस स्टेशन, टिळक नगर पोलीस स्टेशन, मानपाडा पोलीस स्टेशन व एसीपी कार्यालय स्पेशल ब्रांच ठाणे पोलीस अधिकारी,हवालदार सन्माननीय बोडखे सर यांनी उत्कृष्ट असा बंदोबस्त दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक संस्थेचे सचिव श्री जगदीश उगले सर व अध्यक्ष सन्माननीय श्री अशोक जगताप सर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नेहमीप्रमाणे डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचा कार्यक्रम उत्कृष्ट झाला त्याबद्दल सर्वांचे आभार सचिव श्री जगदीश उगले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button