महाराष्ट्र

बीड जिल्हा बंजारा ब्रिगेड ची आढावा बैठक संपन्न….!

भारतीय संघर्ष.....

 

गेवराई! विष्णु राठोड…

दिनांक 4 एप्रिल रोजी बंजारा ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत गेवराई येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीत बंजारा ब्रिगेड च्या पुढील वाटचालीसाठी संदर्भात चर्चा करून तांडा तेथे शाखा अनावरण करून तांड्यातील विविध समस्या अणि त्या समस्या सोडविण्यासाठी बंजारा ब्रिगेड सज्ज राहणे गरजेचे आहे व अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमासाठी बंजारा ब्रिगेड चे प्रदेश प्रवक्ते अनिल भाऊ खोला प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ आमगोत जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ पवार यांची पण मार्गदर्शन पर भाषणे झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीड जिल्हा सचिव प्रमोद भाऊ राठोड यांनी केले व अनुमोदन तालुका अध्यक्ष अमोल भाऊ राठोड यांनी केले यामध्ये काही नवीन पदाधिकारी यांची निवड व जुन्या पदाधिकारी यांची फेरनिवड करण्यात आली तसेच प्रदेश प्रवक्ते अनिल राठोड खोला प्रदेश उपाध्यक्ष सतीश आमगोत व जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले तालुका फेरनिवड म्हणून तालुका अध्यक्ष पदी अमोल भाऊ राठोड उपाध्यक्ष अंकुश राठोड व पोपट चव्हाण सचिव योगेश राठोड सह संघटक बाळू जाधव माजलगाव तालुका अध्यक्ष पदी भानुदास भाऊ जाधव यांची निवड करण्यात आली तसेच नवीन पदाधिकारी यांच्या निवडी मध्ये तुळशीराम भाऊ जाधव सोशल मीडिया जिल्हा प्रमुख विष्णु राठोड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गेवराई तालुका युवक अध्यक्ष पदी रविंद्र पवार तालुका संघटक विठ्ठल राठोड तालुका सोशल मीडिया प्रमुख बाळू पवार तालुका सह सचिव सुरेश चव्हाण तालुका विद्यार्थी आघाडी रमेश राठोड यांच्या नव्याने निवडी करण्यात आल्या,


तसेच काही सर्कल च्या पदाधिकारी यांची पण निवड करण्यात आली त्यात जातेगाव सर्कल प्रमुख पदी दत्ता राठोड उप सर्कल प्रमुख अविनाश पवार सचिव पदी राहुल पवार व गढी सर्कल प्रमुख पदी भास्कर राठोड यांची निवड करण्यात आली अशा प्रकारे बंजारा ब्रिगेड च्या आढावा बैठकीत नियोजन करण्यात आले या बैठकी साठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त युवकांनी हजेरी लावली व प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे समारोप पर भाषण राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button