महाराष्ट्र

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान”, संपन्न .

भारतीय संघर्ष Live...

 

गेवराई! विष्णु राठोड..

गेवराई तालुक्यातील
माटेगाव येथे राज्य शासनाच्या निर्देशानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अभियान राबविण्यात येत असून माटेगाव येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात दि.14 मार्च 2026 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. संदीप खोमणे साहेब तहसिलदार गेवराई यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. कट्टे साहेब नायब तहसिलदार, मा.कुटे मॅडम नायब तहसिलदार गेवराई, मा.श्री.मोरे साहेब नायब तहसिलदार गेवराई हे होते व माटेगाव मंडळाचे मंडळ अधिकारी श्री. मोराळे व मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व तलवाडा मंडळाचे मंडळ अधिकारी श्री.बाबा बडे व महसूल व इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी व
यावेळी माटेगाव चे सरपंच श्री. माऊली अरबड,व देवपिंपरी, भोजगाव, ब्रह्मगाव, खळेगाव शेकटा,राजपिंपरी येथील सरपंच उपसरपंच सदस्य, गट विकास अधिकारी अनिरुद्ध सानप, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय गोंडीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या शिबिरामध्ये उपस्थित माटेगाव मंडळातील सर्व गावातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा व अभिलेख दुरुस्ती 20,जातीचे दाखले 50 मतदान ओळखपत्र 40 शिधापत्रिका 60 डिजिटल सात बारा 20 व विविध प्रमाणपत्रांचे वाटप, विद्यार्थी दाखले, आधार व इतर शासकीय सेवा देण्यात आल्या . याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती देऊन नागरिकांना त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. याशिवाय आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी व युवकांनी सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे शिबिरे अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसील कार्यालय गेवराई, महसूल मंडळ अधिकारी कार्यालय माटेगाव तसेच संबंधित विभागांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button