महाराष्ट्र

ना.संजयभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत काठोडा तांडा येथे बंजारा महामेळावा आयोजित – – प्रा.पी.टी.चव्हाण

भारतीय संघर्ष Live...

गेवराई ! विष्णु राठोड...

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण कॅबिनेट मंत्री तथा बंजारा समाजाचे धाडसी लोकनेते “आपला माणूस” ना.संजयभाऊ राठोड हे शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गेवराई तालुका दौऱ्यावर येत असून अखिल भारतीय बंजारा समाजाचे दैवत राष्ट्रसंत सदगुरु सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील संत रामराव महाराज गड काठोडा तांडा येथे बंजारा समाजाचा महामेळावा, बंजारा लेंगी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाला ना.संजयभाऊ राठोड मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रमाला बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा राष्ट्रीय बंजारा राजकीय परिषदेचे अध्यक्ष प्रा.पी.टी.चव्हाण यांनी केले आहे.
समस्त बंजारा समाजाच्या वतीने आयोजित रामराव महाराज गड काठोडा येथील संत सेवालाल महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या वेळी बंजारा लेंगी स्पर्धा व विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.या सोहळ्याला बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार दरबारी शर्थीचे प्रयत्न करून अनेक लोकोपयोगी योजना सुरू करायला भाग पाडणारे समाजाचे शांत संयमी अभ्यासू धाडसी व आक्रमक नेते,कॅबिनेट मंत्री “आपला माणूस” आदरनिय ना.संजयभाऊ राठोड व बंजारा समाजाचे धर्मगुरू तथा आमदार आदरनिय बाबूसिंगजी महाराज तसेच इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी गेवराई तालुका सह बीड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावे आणि बंजारा समाजाच्या संघटित ताकदीचे दर्शन घडवावे असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश महामंत्री तथा संत सेवालाल महाराज बंजारा लबाणा/ तांडा समृद्धी योजनेचे बीड जिल्हा अशासकीय सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button