महाराष्ट्र

अट्टल महाविद्यालयाच्या प्रा. स्वाती कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…

भारतीय संघर्ष Live...

 

गेवराई ! विष्णु राठोड…

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथील संगणकशास्त्र विषयाच्या प्रा. स्वाती कुलकर्णी यांच्या ‘डेटा स्ट्रक्चर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. विठ्ठल पतंगे हे त्यांचे सहलेखक आहेत.
अट्टल महाविद्यालयात गणित व संगणकशास्त्र विभागाच्या वतीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या प्रायोजकत्वाखाली नुकतीच गणित व संगणकशास्त्र या विषयांची एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. एम. बी. ढाकणे (माजी विभागप्रमुख, गणित विभाग) यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रजनी शिखरे या होत्या. विशेष उपस्थितीमध्ये डॉ. जे. ए. नन्नावरे, डॉ. बी. आर. सोनटक्के उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संगणकशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा व मूलभूत मानला जाणारा बी.एस्सी. द्वितीय वर्ष नवीन शैक्षणिक धोरणानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील अभ्यासक्रमावर आधारित ‘डेटा स्ट्रक्चर’ हा विषय विद्यार्थ्यांना सोप्या, सुबोध आणि उदाहरणाधारित पद्धतीने समजावा, या उद्देशाने हे पुस्तक सिद्ध करण्यात आले आहे, असे मान्यवरांनी सांगितले.
सदरील पुस्तकात विविध डेटा स्ट्रक्चर्सची संकल्पना, त्यांची रचना, कार्यपद्धती, अल्गोरिदम्स, तसेच त्यांचे व्यावहारिक अनुप्रयोग यांचे सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. पदवी विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असल्याचे यावेळी मान्यवर म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बालाजी रुपनर, प्रबंधक भास्कर सुरवसे, कार्यालयीन अधीक्षक भागवत गवंडी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. राजेश शेषम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button