महाराष्ट्र

बंजारा ब्रिगेडची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर.. बंजारा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल राठोड, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी ॲड.कीर्तीताई जाधव, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्षपदी सुमित पवार तर कलावंत आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अमोल राठोड यांची निवड.

भारतीय संघर्ष Live...

 

विष्णु राठोड ! गेवराई….

महाराष्ट्रातील बंजारा भटक्या विमुक्त समाजाच्या मान,सन्मान, न्याय,हक्क व अधिकारासाठी तसेच प्रामुख्याने शिक्षण, आरक्षण व इलेक्शन हे विषय घेवून समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देणारी संघटना म्हणून बंजारा ब्रिगेड ला ओळखल जात.
राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षापासून ही संघटना प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्यामध्ये यशस्वी झालेली आहेत. यावर्षीची नवीन प्रदेश कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड व राष्ट्रीय सचिव डॉक्टर मुकेश पवार यांच्या मान्यतेने काल दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.


या नवीन कार्यकारणीच्या बंजारा ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल राठोड, प्रदेश कार्याध्यक्षपदी रविंद्र पवार, प्रदेश उपाध्यक्षपदी जयवंत राठोड, सतीश पवार, रतनसिंग जाधव, प्रदेश महासचिव म्हणून युवराज आडे, प्रदेश सचिव अरुण राठोड तर प्रदेश सहसचिव पदी ऍड.पंडित राठोड यांची निवड करण्यात आलेली आहे.


त्याच सोबत विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुमित पवार तर कलावंत आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अमोल राठोड यांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे.
महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ.ॲड.कीर्तीताई जाधव, प्रदेश उपाध्यक्षपदी सौ.मनिषाताई राठोड, सौ. कमलताई चव्हाण, सौ.ॲड.सीमाताई जाधव, प्रदेश सचिवपदी सौ. संध्याताई पवार, प्रदेश संघटकपदी सौ. शितलताई राठोड यांची तर मराठवाडा अध्यक्षपदी सौ.सुशीलाताई राठोड यांची निवड करण्यात आलेली आहे.
सोबतच महाराष्ट्रातील सर्व विभागाच्या विभागीय अध्यक्षांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे यामध्ये मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी रविराज राठोड, विदर्भ अध्यक्षपदी जिवती नगरपालिकेचे सभापती अमर राठोड, खानदेश विभागीय अध्यक्षपदी नंदुरबार पंचायत समितीचे सभापती तेजमल पवार, पुणे विभागीय अध्यक्षपदी दिलीप जाधव, कोकण विभागीय अध्यक्षपदी जीवन चव्हाण तर मुंबई विभागीय अध्यक्षपदी शंकर पवार यांची निवड करण्यात आलेली आहे.
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात संघटनेचे चांगले सामाजिक कार्य घडो अशा सदिच्छा देताना त्यांच्या पुढील कार्यास संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड व राष्ट्रीय सचिव डॉ. मुकेश पवार यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तसे पत्र बंजारा ब्रिगेडच्या वतीने आमच्या प्रतिनिधीकडे प्रसिद्धीस दिलेले आहे.

या बंजारा ब्रिगेडच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्रभरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button