प्रकाश घोळवे पुणेशासनाने 2026 -27 साठीमहाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत दप्तर योजना लागू केलेली आहे त्यासाठी शासनाने 165 कोटी रुपयाची नियोजन केलेले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे शासनाला निवेदन देण्यात आलेले आहे की ज्याप्रमाणे शाळेचे गणवेश खरेदी करण्याचे अधिकार शिक्षण समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे दप्तर खरेदी करण्याची सुद्धा अधिकार शिक्षण समितीला देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे समन्वयक प्रकाश घोळवे यांनी शासनाकडे केलेली आहे चांगल्या दर्जाचे गणवेश व चांगल्या दर्जाचे दप्तर शाळेने खरेदी करावेत अशी मागणी शासनाकडे केलेली आहे