महाराष्ट्र

रा वि नेरूरकर हायस्कूलमध्ये नवभारत साक्षरता अभियान संपन्न

भारतीय संघर्ष......

श्री, प्रवीण खाडे सर,

कल्याण :- (प्रतिनिधी):-नवभारत साक्षरता अभियान
रा.वि नेरुरकर हायस्कूल डोंबिवली पूर्व या शाळेत दिनांक 27 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी


स्वकल्पनेने रेखाटलेल्या अतिशय प्रभावीपणे चित्रांचे पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनात एकूण 65 विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. माउंटबोर्ड वरती विविध रंगांमध्ये अतिशय बोलक्या कलाकृती सादर केले आहे. साक्षरता, प्रौढ साक्षरता, डिजिटल साक्षरता, अशा ज्वलंत विषयावरती विद्यार्थ्यांनी चित्रे काढली “पढेगा इंडिया, तभी तो आगे बढेगा इंडिया. समृद्ध भारत, साक्षर भारत, अशी घोषवाक्य सुद्धा लिहिली होती. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना तसेच नागरिकांना हे प्रदर्शन पहावयास मिळाले.यावेळी सी.आर.सी 20 च्या केंद्रप्रमुख सौ. मनीषा खापर्डे मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.योगिता गांगुर्डे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ.वंदना नेरुरकर मॅडम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button