महाराष्ट्र

अमरसिंह पंडित यांचे खंदे सक्रिय कार्यकर्ते शेख लाला अब्दुल यांच्या पाठपुराव्याला यश

भारतीय संघर्ष.....

गेवराई -प्रतिनिधि,

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील आई भवानी माता व त्वरितादेवीच्या पायथ्याशी वसलेले अंबीका नगर तहत मोहमदिया नगर गेल्या आणेक दिवसापासून अंधारात होते. या काळात गणपति बप्पा व माता लक्ष्मीचे सन देखील या दोन्ही वसाहती मध्य आंधारातच साजरे झाले. कारण या ठिकाणी आसनारे दोन्ही ट्रांसफार्मर पुर्वी शंभरचे होते. महावितरणच्या काही कर्मचा-यांनी अर्थीक लाभापाई १०० आसनारे ट्रांसफार्मर इतरत्र हालऊन या ठिकाणी ६३ चे ट्रांसफार्मर बसवले होते. त्या मुळे अंबीका नगर व मोहमदिया नगरच्या दोन्ही ट्रांसफार्मरचे फेलो रिपोर्ट निघत नसल्याने अमरसिंह पंडित यांचे निकटवर्तीय आसलेले शेख लालाभाई यांनी महावितरणचे पदाधिकारी श्री प्रधान साहेब, कांडेकर साहेब, व जाधव साहेब यांच्याशी सातत्याने संपर्क साधत पाठपुरावा करुन हि बाब माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या निदर्शनास आणुन दिली आसता मा. अमरसिंह पंडित यांनी शनाचाही विलंब न लावता दिनांक ७/१०/२००२६ रोजी अंबीका नगर तहत मोहमदिया नगरचे दोन्ही रोहित्र(ट्रांसफार्मर) एकाच दिवसात उपलब्ध करून दिले. येथील महावितरणचे कर्मचारी भारत काळे व सोबत त्यांच्या दोन्ही मुलांनी याच दिवशी दोन्ही ट्रांसफार्मर नियोजित जागी बसऊन लागलीच गेल्या आणेक दिवसापासून अंधारात असलेल्या दोन्ही वसाहतीस प्रकाशमय केले. या दोन्ही वसाहती या ठिकाणी वास्तव्यास आसलेले जाज्वल्य दैवत माता त्वरितादेवी व आई भवानी माता परिसरात असल्या कारणास्तव नवरात्रि उत्सवसाठी देखील या दोन्ही रोहिरात्रामुळे रोषनाई होणार आसल्याने अंबीका नगर तहत मोहमदिया नगरच्या रहिवासीयांसह भाविक भक्तगणातुन शेख लालाभाई यांचे कवतुक होत असुन माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे मोठ्या प्रमाणात आभार मानल्या जात आहे. तसेच या दोन्ही वसाहती मधील तरुणांनी या कामात मोलाची भूमिका बजावल्याने शेख लालाभाई यांनी या तरुणांचे देखील आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button