महाराष्ट्र

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड. “पक्षाने दाखविलेला विश्वास जनसेवा आणि संघटनबांधणीतून सार्थ ठरवू” — आदित्य घरत

भारतीय संघर्ष न्यूज........

 

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ,कट्टर,प्रामाणिक कार्यकर्ते, कामगार नेते, काँग्रेसचे जेष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत असलेले आदित्य यशवंत घरत यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभ हस्ते आदित्य घरत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या निवडीबद्दल आदित्य घरत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांचे तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
“माझी उपाध्यक्षपदी निवड करून माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मी दोन्ही मान्यवरांचा मनःपूर्वक आभारी आहे. ही निवड माझ्यासाठी केवळ पदाची जबाबदारी नसून काँग्रेस पक्षाची विचारधारा, लोकशाही मूल्ये आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा आहे,” अशी भावना आदित्य घरत यांनी व्यक्त केली.

उरण तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, जनतेच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“माझ्यावर दाखविलेला विश्वास जनसेवा, संघटनबांधणी आणि लोकहिताच्या कार्यातून सार्थ ठरविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आपला विश्वास, आपले मार्गदर्शन आणि जनतेची साथ हीच माझी खरी ताकद आहे,” असा विश्वासही आदित्य यशवंत घरत यांनी व्यक्त केला.काँग्रेस पक्षाचा, पक्षाच्या ध्येय धोरणाचा आदित्य घरत यांनी तळागाळात प्रचार व प्रसार केला असून पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते असल्यामुळे आदित्य घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.या निवडीमुळे उरण तालुका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आदित्य घरत यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button