महाराष्ट्र

मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ======================= कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ======================= गेवराई विष्णु राठोड गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील त्वरितापुरी कला, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पदवी वितरण समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सेवाभावी संस्थेचे ॲड .सुरेशराव हात्ते हे राहणार आहेत. तर गेवराईच्या तहसीलदार गीतांजली गरड आणि गेवराईचे पोलिस उपविभागीय अधिकारी अनिलजी कटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमास गेवराईचे गटविकास अधिकारी मधुकर बिलगे, गटशिक्षणाधिकारी मयूरजी मोदाणी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण, प्रशासन आणि पोलीस विभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय संघर्ष न्यूज.....

मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

गेवराई विष्णु राठोड,

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील त्वरितापुरी कला, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पदवी वितरण समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सेवाभावी संस्थेचे ॲड .सुरेशराव हात्ते हे राहणार आहेत. तर गेवराईच्या तहसीलदार गीतांजली गरड आणि गेवराईचे पोलिस उपविभागीय अधिकारी अनिलजी कटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमास गेवराईचे गटविकास अधिकारी मधुकर बिलगे, गटशिक्षणाधिकारी मयूरजी मोदाणी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण, प्रशासन आणि पोलीस विभागातील मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button