महाराष्ट्र

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहाराचा आरोप ? ======================= सिमेंट रस्ता,बंदिस्त नाली,पाणी पुरवठा कामाची चौकशी करून अपहाराची रक्कम वसूल करा.. ======================= कार्यवाही करून प्रशासक आणि ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करा – आक्रम सौदागर

भारतीय संघर्ष न्यूज....

 

गेवराई! विष्णु राठोड,

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये 73 लाख 39 हजार रुपयाचा अपहार झाला असून सिमेंट रस्ता,काँक्रिट नाली,पाणी पुरवठ्याची कामे झालेली नसतांना निधी उचलण्यात आला आल्याची रीतसर व्हवचर सहित तक्रार तलवाडा ग्रामपंचात चे विद्यमान उपसरपंच आक्रम सौदागर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या कडे लेखी निवेदन देऊन केली असून जर चौकशी करून कार्यवाही झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तलवाडा ग्रामपंचायत मध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या कामामध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाला आहे,अनेक ठिकाणी कामे न करताच बिले उचलण्यात आली असून जवळपास त्र्यहत्तर लाख एकोणचाळीस हजार रुपाचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याच्या आरोप पुराव्यां सहित देण्यात आला असून ,पाणी पुरवठा आणि स्वच्छता कामाचे काम दाखवून बिल उचलण्यात आले असून सदर कामाची प्रशासकीय मेजर बुक मध्ये कुठेच नोंद नाही,सदर कामाचे अंदाज पत्रक उपलब्ध नसून झालेल्या कामाची अभियंता ,ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,गटविकास अधिकारी यांनी पाहणी केली नाही.तसेच एक ते वीस व्हवचर मध्ये नमूद करण्यात आलेले काम हे नियमबाह्य आणि बोगस आहे.जुन्या रस्त्यावर नवीन कामे दाखवून पैसे उचलण्यात आले असून, बंदिस्त नाली चे बांधकाम करण्यात आले नाही आणि त्यावर पैसे उचलण्यात आले आहे असे आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आले असून या निवेदनाच्या विषयावर कार्यवाही झाली नाही तर येत्या काळात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना दिलेल्या निवेदनात तलवाडा ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच आक्रम सौदागर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button