महाराष्ट्र

आयडियल स्कूल आणि कॉलेजमध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि कॉलेजचा 20 वा वर्धापनदिन सोहळा संपन्न…..

भारतीय संघर्ष न्यूज....

कल्याण प्रतिनिधी,

श्री. प्रवीण खाडे सर 

कल्याण:(प्रतिनिधी): आदर्श शिक्षण मंडळ कल्याण संचलित आयडियल स्कूल आणि कॉलेज कॅम्पस भाल कल्याण येथे “भारताचा 80वा आणि आयडियल कॉलेजचा 20वा स्वातंत्र्य दिवस सोहळा विविध कार्यक्रमानी संपन्न झाला.”


स्वातंत्र्य दिनाचे औचित्यावर आयडियल सी.बी.एस.सी स्कूल आणि डी.एड च्या विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गायनाचे सादरीकरण करण्यात आले. तर डी फार्मसी व बी फार्मसी विद्यार्थ्याकडून देशभक्तीपर सर्व भारतीय भाषेत नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
सदर स्वातंत्र्य दिवस सोहळ्याचे ध्वजारोहण संस्थेचे सहसचिव श्री. विजय लक्ष्मीकांत उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेचे सहसचिव मा. विजय उपाध्याय यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व शाखाचे विद्यार्थ्यांना ” युवा हे देशाचे भवितव्य आहेत. युवांनी आपले पाऊले शिक्षण व प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणे आवश्यक आहे ” असे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी खजिनदार श्री. आर. जे. तिवारी सदस्य- श्री. विवेक उपाध्याय आणि श्री. विनय उपाध्याय , तसेच डी.एड चे प्राचार्य श्री. सी. पी. जाधव फार्मसीच्या प्राचार्या डॉ. सौ. स्मिता टाकरखेडे, सी.बी.एस.सी स्कूलचे प्राचार्य श्री. मुकिंदा सावले. डिग्री व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ.श्री. ब्रम्हावले आणि सर्व विद्याशाखाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सोहळा यशस्वी संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button