महाराष्ट्र

उरणच्या अभय धनाजी ठाकूर यांची थायलंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी.

भारतीय संघर्ष न्यूज...

 

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत Taurus The Gym चे मालक अभय धनाजी ठाकूर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावल्याचे त्यांनी भारताची शान उंचावली आहे.

त्यांच्या या यशामुळे खोपटे गाव,उरण तालुक्यासह रायगडच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.विश्वविजेता अभय ठाकूर यांनी ७५ किलो वजन गटातील Bench Press प्रकारात २०० किलो वजन लिफ्ट उचलून भारतासाठी सुवर्णपदक मिळवले.

तसेच Equipped Bench Press प्रकारातही सुवर्णपदकाची कमाई करत त्यांनी एकूण दोन सुवर्णपदकांचा मान मिळवला.
थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली ही कामगिरी निश्चितच युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान अभय ठाकूर यांनी मिळवला आहे.
Taurus The Gym परिवारासाठी तसेच संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेली ही दोन सुवर्णपदके उरणच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठेवा ठरणार असून, आगामी काळात अनेक युवा खेळाडूंना पॉवरलिफ्टिंगकडे वळण्यासाठी त्यातून नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या अभय धनाजी ठाकूर यांच्या या दमदार कामगिरी बद्दल सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय अभय ठाकूर यांनी त्यांचे नातेवाईक, मिस्टर इंडिया मिस्टर वर्ल्ड पदकाचे मानकरी प्रतिक दर्णे,इंडिया मिस्टर एशिया मिस्टर वर्ल्ड मिस्टर पदकाचे मानकरी भूषण पाटील,taurus जिम फॅमिली, मित्र परिवार यांना दिले आहे आहे.या सर्वांमुळेच हे यश गाठल्याचे अभय ठाकूर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button