महाराष्ट्र

अट्टल महाविद्यालयात एड्स जनजागृती आणि युवांची भूमिका कार्यक्रम संपन्न,

भारतीय संघर्ष न्यूज.....

 

गेवराई ! विष्णु राठोड दि. १२, (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, र. भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने रेड रिबन क्लब अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘एच. आय. व्ही. एड्स जनजागृती आणि युवांची भूमिका’ या विषयावर आधारित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रजनी शिखरे या होत्या. या कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक सुनील सरवदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजकर्त्या शितल गोचडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एड्स जनजागृती मध्ये घ्यावयाची काळजी आणि उपाय योजना यासंदर्भात बोलताना समाजातील विविध घटनांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रा. मीना नागवंशी, डॉ. समाधान इंगळे यांची उपस्थिती होती.


राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. देविदास रिठे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. प्रदीप दहिंडे यांनी आभार मानले. कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी गणेश सुर्यवंशी, सुरेश ढाकणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. महारुद्र जगताप, डॉ. अतुल केचे, डॉ. मारुती यमुलवाड यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button