महाराष्ट्र

२९ मे रोजी बंजारा बिग्रेड भारत यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन उपस्थित राहण्याचे आवाहन…बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख -विष्णु राठोड

भारतीय संघर्ष न्यूज.....

 

गेवराई! विष्णु राठोड…

बंजारा बीग्रेड भारत संस्थापक अध्यक्ष रवीकांत भाऊ राठोड गेवराई येथे आयोजित पत्रकार परिषद व बंजारा सेवक बैठकीत सहभागी होत संघर्ष योद्धा सन्माननीय श्री रवीकांत भाऊ राठोड यांच्या विचारांना उपस्थितांसमोर उजाळा दिला. समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करण्याची प्रेरणा या बैठकीतून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
गेवराई येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या बैठकीत बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजातील गरजवंत, शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या भवितव्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संघर्ष योद्धा रवीकांत भाऊ राठोड (बंजारा बिग्रेड भारत)यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एस टी आरक्षण आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी समाजाने आता निर्णायक भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना अमोल पवार यांनी सांगितले की, “२९ मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील बंजाराच्या (लमाण)लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष , हा लढा केवळ आरक्षणाचा नसून पुढील पिढीच्या हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे. त्यामुळे बंजारा समाजाने मोठ्या संख्येने तलवाडा फाटा येथे उपस्थित राहून रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा द्यावा.”
तसेच समाजातील प्रत्येक घटकाने जात, पक्ष आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. युवकांनी समाजकार्यात पुढाकार घेत संघर्षाच्या या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
या बैठकीनंतर “जय सेवालाल, जय गोर बंजारा, जय बंजारा बीग्रेड” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आगामी 29 मे रोजी धुळे -सोलापूर महामार्ग -गेवराई (तलवाडा फाटा)येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बंजारा ब्रिगेडच्या प्रदेशाध्याक्ष राहुल राठोड, राष्ट्रीय प्रवक्ते अनिल राठोड, प्रदेश उपाध्यक्ष सतिश आमगोत, बीड जिल्हा अध्यक्ष योगेश पवार , बीड जिल्हा सचिव प्रमोद राठोड, बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विष्णु राठोड,गेवराई तालुकाध्यक्ष अमोल राठोड, तालुका युवक अध्यक्ष रविंद्र पवार सह बंजारा बिग्रेड संघटने सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button