महाराष्ट्र

तलवाडा येथील अनेक दिवसापासून नादुरुस्त असलेले फिल्टर दुरुस्त, तलवाडाचे कर्तव्य दक्ष ग्राम विस्तार अधिकारी सोपान मुसळे यांच्यामुळे नागरिकांना मिळणार अल्पदरात शुद्ध व थंड पाणी…

भारतीय संघर्ष....

गेवराई ! विष्णु राठोड…

तलवाडा हे गाव गेवराई तालुक्यातील सर्वात मोठे गाव तशा समस्या ही असतात स्वच्छ्ता, वीज, आरोग्य, पाणी अशा समस्या नेहमीच नागरिकांना भेडसावत असतात तसे उन्हाळा लागला की, पाणी प्रश्न निर्माण होतात परंतु या वर्षी ग्राम पंचायत चया योग्य नियोजनामुळे नेहमीपेक्षा वापराचे पाणी मुबलक असल्याने नागरिकांना समाधान आहे. परंतु स्वच्छ फिल्टर पाणी (RO) तलवाडा येथील नागरिकांना मिळणं तितकंच आवश्यक आहे ही बाब लक्षात घेता ग्रामसेवक मुसळे यांनी प्रश्न मार्गी लावण्याचा ध्यास घेतला.
तलवाडा ग्राम पंचायत मार्फत गणेशनगर(पाण्याच्या टाकी जवळ),कानेश्वर चौक व नव्याने बसवलेले अंबिकानगर देवीच्या मंदिराजवळ असे तीन ठिकाणी फिल्टर बसवलेले आहे. यामध्ये ऐन गावातील मोठ्या लोक वस्तीतील गणेशनगर व कानेश्र्वर चौक येथील फिल्टर मागील अनेक महिन्यापासून दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत होते यामुळे या वर्षी तापमान हे नेहमी पेक्षा जास्त असल्याने थंड पाण्यासाठी तलवाडा नागरिकांना वण – वण फिरावे लागत होते तर खाजगी पाणी विक्रेत्या कडून जास्तीचे पैसे मोजून आपली तहान भागवावी लागत होती.तर अनेक नागरिक, गोर गरीब कुटुंब रोज विकत पिण्याचे पाणी घेऊ शकत नसल्याने नळाचे पाणी तसेच इतर विहिरी,हातपंप अशा ठिकाणाहून अस्वच्छ( पिण्यास अयोग्य असलेले) पाणी पिण्यास वापरत आहेत या मुळे महिला,पुरुष,लहान मुले, यांचे आरोग्य धोक्यात येऊन अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे त्यामुळे तलवाडा येथील ग्राम विस्तार अधिकारी श्री.सोपान मुसळे यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेता तात्काळ मागील अनेक दिवसापासून नादुरुस्त असलेले पाणी फिल्टर दुरुस्त करून अल्पदरात म्हणजे ५ रू. मध्ये २० लिटर पाणी देऊन तलवाडा करांची तहान शुद्ध व थंड पाणी देऊन तहान भागवली आहे. यामुळे तलवाडा येथील जनतेकडून प्रशासक श्री . चोपडे साहेब व ग्राम विस्तार अधिकारी श्री सोपान मुसळे साहेब यांचे अभिनंदन होत आहे.
——————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button