महाराष्ट्र

गेवराई येथे सदिच्छा भेट, बंजारा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे आण्णासाहेब राठोड व उत्तम भाऊ चव्हाण यांनी वेधले लक्ष.

भारतीय संघर्ष Live....

 

गेवराई : विष्णु राठोड…

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी शनिवारी गेवराई येथील ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब राठोड यांच्या निवासस्थानी व जिल्हा कार्यालयात सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे गेवराई शहरासह परिसरातील बंजारा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


चहापानाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत समाजहिताच्या विविध विषयांवर तसेच बीड जिल्हा आणि गेवराई मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी आण्णासाहेब राठोड यांनी बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे नामदार संजय राठोड यांचे लक्ष वेधले. तसेच शिक्षण, रोजगार, समाजाच्या मूलभूत सोयीसुविधा आणि स्थानिक विकासकामांबाबत काही महत्त्वपूर्ण निवेदनेही त्यांच्याकडे सादर करण्यात आली.
मंत्री नामदार संजय राठोड यांनी समाजाच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत, या विषयांवर अधिक सखोल चर्चा करण्यासाठी आण्णासाहेब राठोड यांना मुंबई येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या प्रसंगी पोहरादेवी गड येथील महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, सामाजिक कार्यकर्ते पी. टी. चव्हाण, उत्तम भाऊ चव्हाण, रमेश पवार, शिवसेना बीड जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नवले, ए. टी. चव्हाण, राजेंद्र जाधव, बाबासाहेब राठोड, बाबासाहेब चव्हाण, अशोक राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, रामेश्वर पवार, गोरख पवार, रमेश जाधव, राम (नाना) राठोड, संतोष राठोड, भानुदास राठोड, वैभव शिनगारे यांच्यासह ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार संजय राठोड यांच्या या सदिच्छा भेटीमुळे गेवराई परिसरातील बंजारा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होण्याबाबत आशावाद व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button