बीड /गेवराई प्रतिनिधी,
प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील 3 शासकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कडक कारवाई करावी तसेच जिल्हा परिषद शाळा तलवाडा येथील मुखध्यापक विजय डोंगरे यांनी कोणते हि परवानगी न घेता या कार्यकमला संमती कशी दिली याची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष शेख खिजर, जयदेव शिंगणे, बाळू डहाळे,सुनीता भाभी गिल यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या खाजगी संस्थेच्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे व अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणारे दत्तू शिंदे ,पोलीस उप निरीक्षक, तलवाडा, श्रीमती मयुरी कचरे ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक, ग्रा.पं. तलवाडा तसेच डॉ. शेख साद वैद्यकीय अधिकारी, पी.एच.सी. तलवाड या जनतेच्या सेवक असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांनी केली आहे.


गेवराई तालुक्यातील तलवाडा याठिकाणी एका प्रतिष्ठान च्या वतीने कोणतीही परवानगी नघेता जिल्हा परिषद शाळा तलवाडा याठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला यास शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरिष्ठांची कोणतीही मान्यता नघेता कार्यक्रम घेऊन दिला तसेच या कार्यक्रमास तलवाडा येथे कार्यरत असणारे शासनाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत जनतेची कामे सोडून उपस्थिती दर्शविल्याने यांना वरिष्ठांचे धाक राहिले नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून खाजगी कार्यक्रमाला जायचे असल्यास वरिष्ठांची परवानगी असणे आवश्यक असते किंवा रजा टाकने बंधनकारक आहे.परंतु या अधिकारी यांनी शासकीय कामाच्या वेळेस कार्यालयीन कामाला सोडून एका खाजगी कार्यक्रमास गेल्याने सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला असल्याने यांची चौकशी करून यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष शेख खिजर, जयदेव शिंगणे,बाळू डहाळे, सुनीता भाभी गिल यांच्यासह पदाधिकारी यांनी केली आहे.आता या अधिकाऱ्यावर काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
Back to top button
