महाराष्ट्र

घंटागाडी बनली शोभेची वस्तु; पाच महिन्यापासून एका जागेवर उभा, गावात गल्लो – गल्ली कचऱ्याचे ढीग,घाणीचे साम्राज्य..  

भारतीय संघर्ष न्यूज..

 

गेवराई ¡विष्णु राठोड,

पंधरावा वित्त आयोगाचा तीन लाख शाहत्तर हजार रुपये निधी खर्चून स्वच्छ तलवाडा,सुंदर तलवाडा हा नारा देत घंटा गाडी खरेदी केली परंतु नव्याने आणलेले गाडी पाच ते सहा महिन्यापासून एका जागेवर उभी करून फक्त शोभेची वस्तु बनली असल्याने गावात गल्ली मध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत असून घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने घंटा गाडी सुरू करण्याची मागणी नागरीकडून होत आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची विविध विकास नावाला दाखवून विल्हेवाट लावली आहे.काही कामे न करताच निधीवर डल्ला मारण्याचे काम झाले असून ,कोणती कामे केली आणि कोणती नाही याचा काहीच ताळमेळ बसत नाही,अनेक कामाचे इस्टिमेट उपलब्ध नाहीत ,तर अनेक कामाची मेजर बुक उपलब्ध नसल्याने सर्व सावळा गोंधळ निर्माण झाला असून गावात स्वच्छता राखण्यासाठी गावातील गल्लीमध्ये कचरा बाहेर नेऊन टाकण्यासाठी घंटा गाडी खरेदी केली असून दोन ते अडीच लाख रुपये किमतीच्या गाडीला पावणे चार लाख रुपये दाखवले असल्याने गावात उलट सुलट चर्चा सुरू असून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची अफरातफर करण्याची आल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहेत.जी घंटा गाडी खरेदी केली ती आणल्या पासून म्हणजे जवळपास पाच ते सहा महिन्यापासून एकाच जागेवर शोभेची वस्तु ठेवल्या प्रमाणे उभी आहे.इतक्या दिवसा पासून नवी गाडी उभी असल्याने तिची बॅटरी ही खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून विकासाला गती देणाऱ्या ग्रामसेवकला ही घंटा गाडी दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.दोन महिन्याच्या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी मधून जवळपास सत्तर लाखाच्या निधी उचलण्यात आल्याची चर्चा गावात चौका चौकात नागरिकांमध्ये होत असून ज्या ग्रामसेवकाने साधा एक खडीचा खडा किंव्हा सिमेंट चे टोपले गावात एखाद्या ठिकाणी टाकले नाही त्यांनी नेमक्या कोणत्या विकासाला गती दिली याची पण चवीने चर्चा आता होऊ लागली आहे

गावात,लाईट,पाणी,स्वच्छता,आरोग्य,साफ सफाई,यासारख्या मूलभूत सुविधा वेळेवर नागरिकांना मिळत नाहीत,प्रमाणपत्रे घेण्यासाठी कधी कधी ताटकळत बसावे लागते अशी परिस्थिती असताना स्वच्छतेच्या नावाने नुसती बोंब सुरू असल्याने घाट गाडी तत्काळ सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button