महाराष्ट्र

मोहिंदरसिंग काबलसिंग हायस्कूल मध्ये भक्तीमय वातावरणात दिंडीचे आयोजन,

भारतीय संघर्ष न्यूज......

श्री, प्रवीण खाडे सर,

कल्याण:-(प्रतिनिधी):मोहिंदरसिंग काबलसिंग हायस्कूल व महाविद्यालय यांनी आषाढी वारी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडला.आजच्या दिंडीचे खास आकर्षण चार घोडे ,बग्गी ,बैलगाडी या साधनासह 200 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अतिशय उत्साहात रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषात वातावरण भक्तिमय केले.

साक्षात पंढरपूरात आल्याची भावना होत होती. ही दिंडी मोहिंदरसिंग शाळेपासून काबलसिंग मेंशन महावीर जैन शाळा, काळातलाव, बेतूरकरपाडा , गजानन महाराज मंदिर ते परत शाळा हा संपूर्ण मार्ग अक्षरशः भक्ती रसात न्हाऊन निघाला.

परत आल्यानंतर सर्व माऊली दिंडीतील भक्तांना श्री संतोष उपाध्याय यांनी खिचडी वाटप केले.
हा आषाढी दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दलबिरसिंग सैनी,सचिव श्री परमप्रितसिंग सैनी , खजिनदार श्री परमवीरसिंग सैनी, मुख्याध्यापिका जयश्री सुधाकरन यांचे मार्गदर्शन लाभले. हा दिंडी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री दशरथ आगवणे , विकास यादव प्रज्ञा कदम, संजय पाटील,प्रज्ञा पाटील महाविद्यालय प्राध्यापिका श्रुती पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोनूसिंग राठोड, उत्साही दिपक मुरुडकर काका यांनी मोलाची कामगिरी बजावली. सालाबादप्रमाणे
संपूर्ण वारी यशस्वी करण्यासाठी क्रिडा शिक्षक दशरथ आगवणे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button