महाराष्ट्र

ठाणे येथे ३१ मे रोजी समता सैनिक दल शताब्दी महोत्सव अधिवेशन संपन्न होणार…! ” प्रचंड संख्येने उपस्थित रहावे ” 

भारतीय संघर्ष न्यूज....

भारतीय संघर्ष वृत्तसेवा……

ठाणे  (प्रतिनिधी ) :विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या नेतृत्वाचा तीस वर्षांचा सहवास लाभलेल्या समता सैनिक दलाचे शतक महोत्सवी अधिवेशन दि.३१ मे २०२६ रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ९ ते सायं. ६ दरम्यान संपन्न होणार आहे.या अधिवेशनाचे आयोजन समता सैनिक दल, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या अधिवेशनाचे उदघाट्न ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा.संदीप माळवी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून दै.वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक मा.कुणाल कांबळे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अशोक खनाडे, राष्ट्रीय महासचिव प्रा.डॉ.गुलाबराव राजे, राष्ट्रीय समन्वयक धम्मा कांबळे, बौद्धिक प्रमुख रमेश जाधव, ऍड.अभय लोखंडे, अशोक टेम्भरे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
विशेष अतिथी म्हणुन समता सैनिक दलाचे दिल्लीचे टेकसिंह गौतम, आंध्रप्रदेशचे शाम मनोहर दासरी , डॉ.एम ए.वेलुसामी (तामिळनाडू) , भानुभाई चौहान (गुजरात) ,रवींद्र बौद्ध (तेलंगाना) , जी.सी.वेंकट रामण्णाप्पा (कर्नाटक) , महेश चौबे (मध्यप्रदेश) , फणेंद्र कुमार (आंध्रप्रदेश) , यशवंत चौहान (हरियाना) , जितेंद्र प्रसाद (पश्चिम बंगाल) , दिलशाद तहसीलदार (कर्नाटक) यांचेसह कोअर कमिटी, राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनास महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यातील 2000 प्रशिक्षित सैनिक उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 9 वाजता समता सैनिक दलाचे झेंड्याला व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मानवंदना देऊन अधिवेशनाची सुरुवात होणार आहे.
उद्घाटन सत्रात क्रांतीगीते, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन होऊन, समता सैनिक दलाचे ऐतिहासिक वाटचाल व वर्तमानकाळातील महत्व याबाबत भाषणे होणार आहेत. तसेच विविध मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दल शताब्दी एक प्रवास, समता सैनिक दल वाढविण्यासाठी आदर्श संकल्पना , भारत राष्ट्र निर्माण ही प्रबोधन सत्रे पार पडतील . यात विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. क्रांतिगीते, पथनाट्य, जिल्हा कार्य अहवाल, मुक्त संवाद अशा विविध सत्रात बौद्धीक रेलचेल असेल. यावेळी समता सैनिक दलाचे तामिळनाडूचे डॉ. वेलूसामी, गुजरातचे भानुभाई चौहान, तेलंगणाचे रवींद्र बौद्ध, कर्नाटकाचे वेंकटरमणप्पा, दिलशाद तहसीलदार, मध्यप्रदेशचे महेश चौबे, आंध्रचे फनिंद्रकुमार, हरियाणाचे यशवंत चव्हाण, पश्चिम बंगालचे जितेंद्र प्रसाद, राष्ट्रीय संघटक संजय ओरके, इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करतील.
या अधिवेशनात शिक्षण,आरोग्य , आर्थिक व सामाजिक न्याय, भारत राष्ट्र निर्माण, संविधान व लोकशाही व्यवस्थेचे महत्व इ.महत्वाच्या विषयावर अनेक ठराव पारित केले जातील.
सदर कार्यक्रमाला देशभरातून आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांना निमंत्रित केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक आयोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन समता सैनिक दल राज्य कार्यकारिणीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button