महाराष्ट्र
तलवाडा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, हजारो भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी तलवाडा येथे दाखल….
भारतीय संघर्ष....

बीड/गेवराई -विष्णु राठोड…….
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे दरवर्षी प्रमाणे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम ज्योती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असुन १४ एप्रिल रोजी जयंती दिना निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक जुने बस स्टॅण्ड या ठिकाणी जिल्ह्यात नव्हे असा भव्य दिव्य पुर्ण कृती पुतळा असुन या ठिकाणी परिसरातील गावे तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील अभिवादन करण्यासाठी तलवाडा या ठिकाणी दाखल झाले व अभिवादन सभा घेऊन तालुक्यातील विविध राजकीय नेते उपस्थित होते
या बाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे दरवर्षी प्रमाणे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाच ते सहा दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते १४ एप्रिल रोजी सर्व प्रथम बाबासाहेबांस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते निळा ध्वजारोहण करून त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या वेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात म्हटले की, बौद्ध समाजाच्या या वर्षी स्मशान भूमी प्रश्न मार्गी लावला ही स्मशान भूमी मागणी करण्यासाठी स्वतः समाजाची मागणी होती आज ती पूर्ण झाली असुन काम प्रगती पथावर आहे तर गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका करण्यात येईल हा शब्द मी गेल्या जयंती निमित्त केला होता आज ती अभ्यासिका काम चालू असुन पुढील वर्षी जयंती दिना पर्यंत ही अभ्यासिका सुरू होईल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व मार्गदर्शनास अनेकांची भाषणे झाली यात आरपीआय तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड सुरेश हत्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर,समाजभूषण अनिल तुरूकमारे, पॅंथरचे धम्मपाल कांडेकर, लहुजी सेनेचे दादाराव रोकडे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केली तसेच या कार्यक्रमास विविध तसेच राजकीय पक्ष चे कार्यकर्ते, सर्व समाज बांधव, पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तलवाडा ग्रामपंचायत चे प्रशासक चोपडे दादा यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. विजय डोंगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन माऊली नाना डोंगरे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम ज्योती उत्सव समितीच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.



