बीड /गेवराई! विष्णु राठोड….
महावितरण कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग क्र. २ अंतर्गत काम करीत असतांना वर्ष २०२५-२६ मध्ये चैतन सुरासे यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरी करीता त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
चिकलठाणा शाखा अंतर्गत वर्ष २०२५-२६ मध्ये थकबाकी वसुलीमध्ये लाईनमन चैतन सुरासे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे महावितरणाच्या महसूलामध्ये वाढ झालेली आहे. ही बाब तांत्रिक कौशल्य व महावितरण प्रती लाईनमन चैतन सुरासे यांची सेवाभावी वृत्ती दर्शविते व त्याबद्दल ते अभिनंदनास पाञ ठरले आहे.
भविष्यात चैतन सुरासे यांनी कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध व अधिकाधिक चांगली कामगिरी करावी ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उपविभाग क्र. २ महावितरण कंपनी सर्व क्षेत्रात यशाची नवी उंची गाठेल असे गौर उदगार अधिक्षक अभियंता संदिप दरवडे साहेब यांनी चैतन सुरासे यांना शब्बासकिची थाप देत असताना सन्मान पञ देउन व्यक्त केले.या वेळीअधीक्षक अभियंता श्री संदीप दरवडे साहेब, कार्यकारी अभियंता शैलेश कलंत्री साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता लहाने साहेब, उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब सोळुंके साहेब, शाखा अभियंता भालचंद्र जाधव साहेब, उपस्थित होते.