येवता प्रतिनिधी(आप्पाराव सारूक)दि.०४ केज तालुक्यातील केज केंद्रातील तीन शिक्षकांचा एकाच वेळी सेवानिवृत्त झालेने निरोप समारंभ देण्यात आला.आश्रुबा सोनवणे,हनुमंत अंजान व दिगंबर गिरी हे एकाच वेळी सेवानिवृत्त झालेने केज येथील विठ्ठल मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.खा. बजरंग(बप्पा)सोनवणे यांच्या उपस्थितीत तिनी सेवानिवृत्त मूर्तींना निरोप समारंभ देण्यात आला.आश्रुबा सोनवणे हे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असत त्यांनी गटसाधन केंद्र केज,येथे साधन व्यक्ती म्हणून,लव्हूरी केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून,केज केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून तसेच अनेक प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडल्याने कार्यालयाच्या वतीने वरील तिन्ही मूर्तींना एकाच वेळी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा.बजरंग(बप्पा)सोनवणे, श्रीम.सारिका बजरंग सोनवणे,ईश्वर मुंडे,भाई मोहन गुंड,दत्तात्रेय चाटे इत्यादी मान्यवर व शिक्षक आणि पाहुणे तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्तावित भाषणात अश्रुबा सोनवणे म्हणाले आम्ही गरीबांच्या लेकरांना प्रामाणिक पणे शिकविले शैक्षणिक काम केले म्हणूनच आमची लेकर चांगल्या पद्धावर नोकरीसाठी गेले. सर्वकाही प्राप्त केले आता फक्त समाजकार्य करण्यासाठी आयुष्य घालवायचे आहे.