गेवराई /बीड! विष्णु राठोड …
दि. २४ (प्रतिनिधी) जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई च्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने पंचायत समिती गेवराई येथे भेट देऊन तेथील प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. शिवाजी दिवाण यांनी राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थीनीना पंचायत समीती च्या कामकाज विषयी माहिती व्हावी, स्थानिक स्वराज्य संस्था चे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयास भेट देण्यात आली.
या अभ्यास भेटीमध्ये पंचायत समिती गेवराई चे गटविकास अधिकारी श्री. अनिरुद्ध सानप यांनी विद्यार्थीनींना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री. पवार यांनी शिक्षण विभाग व श्री. राम देशमुख यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच अस्थापना, विभाग, कषी विभाग या पंचायत समिती तिल विविध विभागात भेटी देऊन विद्यार्थीनींनी कामकाजाची माहिती घेतली. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. शिवाजी दिवाण, प्रो. डॉ. नामदेव शिनगारे उपप्राचार्य प्रो. डॉ. संगिता आहेर, प्रा. रवी चौधरी, प्रा. बाबु वादे, प्रा गोकुळदास कदम यांच्या सह विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.