महाराष्ट्र
शिवछत्र परिवाराच्या रोजा इफ्तार पार्टीला मोठा प्रतिसाद, ============= अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, ============= शिवछत्र परिवाराकडून सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचा ‘इफ्तार’ सोहळा…
भारतीय संघर्ष Live..

गेवराई! विष्णु राठोड..
दि.१६ (प्रतिनिधी) मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने रविवार, दिनांक १५ मार्च रोजी ‘शिवछत्र’ परिवाराच्या वतीने ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रमाचे गेवराईत अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. शिवछत्र परिवाराकडून आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य आणि सलोख्याच्या इफ्तार सोहळ्याला मोठी उपस्थिती लावून हिंदू-मुस्लिम समाजाने मोठा प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित यांच्यासह शिवछत्र परिवारातील सदस्यांनी याप्रसंगी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

शिवछत्र परिवाराच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने गेवराई मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवछत्र परिवाराच्या निमंत्रणास मान देऊन उपस्थित झालेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवून आणले. या उपक्रमांमधूनच आपल्या समाजातील सलोखा आणि परस्पर प्रेम अधिक वृद्धिंगत होत असल्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. शिवछत्र परिवाराच्या रोजा इफ्तार पार्टीला गेवराई शहरातील मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. मुस्लिम समाजातील रोजादारांसाठी मागील अनेक वर्षांपासून माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित कुटूंबियांच्यावतीने भव्य दावत-ए-इफ्तार शाही आयोजन केले जाते. माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांनी सुरु केलेला हा इफ्तारचा यज्ञ त्यांच्या परिवारातील अमरसिंह पंडित, जयसिंग पंडित व आ. विजयसिंह पंडित यांनी आजपर्यंत सुरु ठेवलेला आहे. दावत-ए-इफ्तार मध्ये शिवछत्र परिवाराने कधीही खंड पडू दिला नाही.
शिवछत्र परिवाराची अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाज बांधवांशी जोडलेली नाळ वेगळीच आहे, हे नाते केवळ मतांच्या राजकारणासाठी नाही तर आपल्या कुटूंबाप्रमाणे त्यांनी हे नाते जोपासले आहे. शहरातील मुस्लिम बांधवांनी राजकीय दृष्टीकोनातून शिवछत्र परिवाराला प्रतिसाद दिला कि नाही याचा कधीही शिवछत्र परिवाराने विचार केला नाही. मात्र दरवर्षी सामाजिक ऐक्य जोपासण्याच्या या उदात्त हेतूने शिवछत्र परिवार नित्य सामाजिक दायित्वातून अशा उपक्रमांचे आयोजन करत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. शिवछत्र परिवाराच्या दावत-ऐ-इफ्तार मध्ये मुस्लिम बांधवांनी गर्दी करून आपले प्रेम शिवछत्र परिवाराविषयी व्यक्त केले आहे.





