महाराष्ट्र

अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीचा जज्बा! गौसिया मेराज शेखने पूर्ण केला आयुष्यातील पहिला उपवास…

भारतीय संघर्ष Live..

 

गेवराई ! विष्णु राठोड..

रमजानचा पवित्र महिना म्हणजे संयम, शिस्त आणि ईश्वराप्रती असलेल्या भक्तीचा काळ. या कडक उन्हाळ्यात मोठ्यांनाही उपवास (रोझा) करणे कठीण जात असताना, एका ६ वर्षांच्या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्थानिक मस्जिदचे इमाम मेराज मौलाना यांची कन्या गौसिया मेराज शेख हिने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आपला पहिला उपवास अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पूर्ण केला आहे
गौसियाने पहाटेच्या ‘सहरी’पासून ते सायंकाळच्या ‘इफ्तार’पर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता आपला हा पहिला रोझा पूर्ण केला. घरातील धार्मिक वातावरण आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे गौसियाला उपवास करण्याची ओढ लागली होती. इतक्या लहान वयात तिने दाखवलेला हा संयम आणि जिद्द पाहून परिसरात तिचे मोठे कौतुक होत आहे.
गौसियाने आपला पहिला उपवास पूर्ण केल्याबद्दल कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. इफ्तारच्या वेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी आणि तिचे कौतुक करण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळींनी गर्दी केली होती. “मुलांना लहानपणापासूनच आपल्या संस्कृतीची आणि धर्मातील मूल्यांची ओळख व्हावी, हे पाहून समाधान वाटते,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button