गेवराई! विष्णु राठोड…
बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र रामरावगड, काठोडा येथे आयोजित ‘बंजारा महामेळावा’, ‘भव्य लेंगी स्पर्धा’ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना आमदार विजयसिंह पंडित उपस्थित राहण्याचे मला भाग्य लाभले या अतिशय मंगल आणि उत्साही वातावरणात उपस्थित राहून सर्व समाजबांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्रीक्षेत्र रामरावगड येथील महंत श्री. सुंदरसिंग महाराज व बंजारा समाज बांधवांनी या कार्यक्रमाचे अतिशय उत्तम नियोजन केले होते.

यावेळी आ.विजयसिंह पंडित यांनी बंजारा समाजाशी सुसंवाद साधून त्यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे अभिवचन दिले. आपली संस्कृती आणि परंपरा अशीच टिकून राहो आणि संत श्री सेवालाल महाराजांचे विचार आपल्याला कायम प्रेरणा देत राहोत, अशी भावनाही यावेळी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाला पोहरादेवी गड येथील महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज,उत्तम भाऊ चव्हाण, रविकांत राठोड,बी.एम.पवार,आण्णासाहेब राठोड , रमेश पवार,ए.टी.चव्हाण,बी.जे.राठोड,परिसरातील बंजारा समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एल.जी.जाधव व वसंत राठोड सर यांनी केले व आलेल्या सर्व समाज बांधवांनी सुंदर महाराज यांनी अभार मानले.
Back to top button
