कल्याण प्रतिनिधी,
श्री. प्रवीण खाडे सर.,…
आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी आपल्या गणराज इंग्लिश स्कूल मध्ये राज्य पुरस्कार विजेत्या गाईडसचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला . आजचा कार्यक्रम कल्याण भारत स्काऊट गाईड चे ट्रेनिंग काऊंसेलर सन्माननीय श्री. प्रविण खाडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सर्व प्रथम सर बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती देऊन गुणवंत गाईडसचे शब्द सुमनांनी व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

यावेळी ज्ञानसागर शिक्षण मंडळ,कल्याण व गणराज इंग्लिश स्कूल नांदिवली कल्याण पूर्व या संस्थेच्या व शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. शामा संजय म्हात्रे ( मॅडम ) आणि सचिव तथा संचालक सन्माननीय श्री. संजय म्हात्रे (सर) यांनी राज्य पुरस्कार प्राप्त 6 गाईडस ला राज्यातील मानाचा पुरस्कार मिळविल्याबद्दल शैक्षणिक वर्ष 2026-27 (इयत्ता 9 वी )आणि 2027-28 ( इयत्ता 10 वी ) या सालाकरिता अनुक्रमे प्रत्येकी 1175/- व 1360/- असे एकूण 2535 /- रुपये रक्कमचे शालेय फी माफीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
Back to top button
