गेवराई ! विष्णु राठोड…
तलवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराचे औचित्य साधून तलवाडा येथील गायरान धारक जे, १९९० पासून गट क्र.१५६६/१५६७ मधील अंदाजे प्रत्येकी (क्षेत्रफळ) तिन तिन एकर गायरान जमिनीवर नामे दादाराव रोकडे मैनोदीन कुरेशी खाजाभाई कुरेशी गंगाराम रोकडे भागवत डोंगरे व रशीद भाई कुरेशी हे निवासी/शेतीसाठी अतिक्रमण करून ताबा उपभोगत आहे.
आमचे मुद्दे:
१. मी भूमिहीन/अल्पभूधारक शेतकरी असून, आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच जमिनीवर अवलंबून आहे.
२. संबंधित जागेवर ३६ वर्षा पासून ताबा असल्यामुळे आमचा पंचनामा करून शासनाच्या नवीन धोरणानुसार गायरान जमिनीचे नियमितीकरण करून मिळावे.
३. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’अंतर्गत आमचे प्रश्न तत्काळ सोडवून न्याय मिळावा,या अश्याचे निवेदन लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी साहेब यांना उपविभागीय अधिकारी सौ.कविताताई जाधव बीडीओ अनिरुध्द सानप मंडळ अधिकारी बडे यांच्या मार्फत देण्यात आले आहे
Back to top button
