गेवराई! विष्णु राठोड…
जिल्हा परिषद शाळा तलवाडा याठिकाणी आयोजित महाराजस्व समाधान शिबिराच्या नियोजनशून्य ते मुळे महसूल च्या वतीने राबवण्यात येणाऱ्या तसेच शिबिरात राबवण्यात येणाऱ्या सुविधा सामान्य माणसांना मिळाल्या नाहीत तसेच याठिकाणी आजी – माजी पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने याठिकाणी विसंगती दिसून आली.मंडळ अधिकाऱ्यांनी करकर्माचे व्यवस्थित नियोजन न केल्याने समाधान शिबिरात सामान्य जनतेला ” अ ” समाधानी रहावे लागले असल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामान्य जनता,शेतकरी यांच्या सुख सोयी साठी गेवराई तालुक्यातील तलवाडा याठिकाणी जिल्हा परिषद शाळा येथे महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये प्रामुख्याने पारधी समाजाला जातीचे प्रमाणपत्र वाटप करणे,अभिलेखे दुरुस्त करणे,विवादग्रस्त प्रकरणे निकाली काढून आदेश पारित करणे,फेरफार अदालत घेऊन सात बारा वितरित करणे,मंडळ अधिकारी कार्यालय बळकटी कारण करणे,यासह सामान्य जनतेशी निगडीत अनेक विषय या शिबिरात घेण्यात आले होते परंतु मंडळ अधिकारी यांच्या नियोजनशून्य कार्यक्रमामुळे काही ठराविक प्रमाणपत्रे वाटप करण्या व्यतिरिक्त जे काही कार्यक्रम पत्रिकेत विषय ठेवण्यात आले होते त्यांना बगल देण्याचे काम याठिकाणी झाल्याने सामान्य जनतेला याचा काही फायदा झाला नसल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी बोलून दाखवल्या यातच काही ठराविक पदाधिकारी यांची खातर जमा तर इतर पदाधिकारी यांना डावलण्याचे काम याठिकाणी झाल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.यावेळी अनेकांनी तलवाडा मंडळाचे मंडळ अधिकारी बाबा बडे यांच्या नियिलोजन शून्य कारकीर्माची खिल्ली उडवली तर सामान्य जनता मात्र या समाधान शिबिरात असमाधानी झाल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले.
Back to top button
