महाराष्ट्र

आनंद ग्लोबल स्कूल लोकधारा कल्याण या शाळेमध्ये’ त्रिदल ज्ञानोत्सव’ या प्रकल्पाचे भव्य आयोजन..

भारतीय संघर्ष Live...

कल्याण प्रतिनिधी,

श्री.प्रवीण खाडे सर...

त्रिदल एज्युकेशन सोसायटी संचलित
आनंद ग्लोबल स्कूल, लोकधारा,कल्याण व प्रबोधनकार ठाकरे इंग्लिश स्कूल , नेतीवली कल्याण .
यांच्या विद्यमानाने विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिनाचे व 28 तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून,” सांस्कृतिक परंपरा आणि अनेक भाषांसह गणित ,विज्ञान व समाजशास्त्र या विषयांची माहिती सांगणारा ‘त्रिदल ज्ञानोत्सव’ या शैक्षणिक प्रकल्पाचे दि.27 व 28 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले. *त्रिदल ज्ञानोत्सव* या प्रकल्पाचे दि. 27/2/2026 रोजी उद्घाटन *चांद्रयानाची* प्रतिकृती आकाशात सोडून मा.सौ.हर्षलीताई थविल-चौधरी, महापौर क. डों.म. पा.यांच्या हस्ते करण्यात आले .शनिवार दि.२८/२/२०२६ रोजी कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी मा . सौ. मनीषाताई गायकवाड,नगरसेविका क.डों म पा ,मा. सौ. शीतल मंढारी ,नगरसेविका क.डो. म. पा.
मा. सौ. स्नेहल मोरे ,नगरसेविका क.डो. म. पा, मा. श्री . अभिमन्यू गायकवाड ,माजी नगरसेवक,क.डो.म.पा. व त्रिदल एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक मा.श्री. एस.जे.पाटील ,मा.श्री.बी.एन.पाटील, संस्थापदाधिकारी मा. श्री. आशिष पाटील, मा. श्री . स्वप्नील पाटील, मा. सौ. मीरा पाटील , मा.श्री.अतुल पाटील,मा. सौ. स्नेहल पाटील व त्रिदल शाळा संकुलातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणे, पारंपरिक मूल्यांचे महत्व सांगणे व ती मूल्य अंगीकारणे. स्वतःच्या कल्पना स्वतःच्या प्रकल्पातून मांडता येणे तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासाची आधुनिक काळाशी सांगड घालणे हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अनेक सुप्त कलागुणांना वाव मिळाला. विद्यार्थ्यांनी भाषण, नाट्यछटा, विविध गणित व विज्ञान विषयाच्या संकल्पना प्रकल्पद्वारे मांडल्या, अनेकांनी वेशभूषेतून आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली. भारतीय संस्कृती बरोबर भारतीय सण उत्सव व सामाजिक परंपरा यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनसह अनेक थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर प्रभावी सादरीकरण करून या महान विभूतींचा जीवन परिचय घडवला. विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रकल्प म्हणजेच ‘चांद्रयान ‘ हा प्रकल्प विशेष आकर्षण ठरला. भारताने अध्यात्मिक व पारंपरिक संस्कृती बरोबरच विज्ञान युगाचाही स्वीकार करावा. असा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद ग्लोबल स्कूल व प्रबोधनकार ठाकरे इंग्रजी शाळेमधील शिक्षक व विद्यार्थ्यांचे अतिथी, संस्थापक, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, जिज्ञासू वृत्ती, कल्पकता, अशी अनेक नैतिक मूल्य
जोपासली गेली. या प्रकल्पामुळे कल्याण परिसरातील विद्यार्थी व पालक वर्गास एक वेगळा कार्यक्रम अनुभवायस मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button