कल्याण प्रतिनिधी श्री. प्रवीण खाडे सर,
ठाणे भारत स्काऊट आणि गाईड ठाणे संलग्न डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कब बुलबुल मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बँड स्पर्धेचे आयोजन प्रकाश विद्यालय डोंबिवली येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करून करण्यात आली ध्वजारोहणासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे माजी अध्यक्ष रोट्रियन महेंद्र भोईर , सचिव रोट्रियन दिनेश भाई खरोटे, माजी अध्यक्ष रोट्रियन प्रकाश शहा,
संस्थेचे अध्यक्ष गोपाल सर ,
मा. सौ ज्योती बारी मॅडम मुख्याध्यापिका प्रकाश विद्यालय ,
मा.श्री अशोक जगताप अध्यक्ष डोंबिवली भारत स्काऊट गाईड ,
मा.श्री जगदीश उगले सचिव डोंबिवली भारत स्काऊट अँड गाईड,
मा. श्री उदय नाईक सर फिजिकल डायरेक्टर पेंढारकर कॉलेज,
मा.श्री गोपाळ सूर्यवंशी सर सल्लागार स्थानिक संस्था,
मा. श्री नरेंद्र राणे सर सल्लागार स्थानिक संस्था
मा.श्री चेतन सर बँड विशारद
मा श्री अशोक सेनवी सर स्काऊट मास्टर ,श्री ठाकरे सर,
श्री वैशाली नाईक मॅडम ,
सौ निर्मला बागल मॅडम
स्काऊट मास्टर हरित मेहता सर उपस्थित होते.
ध्वजारोहणा नंतर स्काऊट गाईड प्रार्थना , झेंडा गीत घेण्यात आले.
नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा डोंबिवली भारत स्काऊट्स गाईड्स स्थानिक संस्थेतर्फे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित सर्व स्काऊट गाईड पदाधिकारी व उपस्थित सर्व शाळांचे स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर बँड स्पर्धा घेण्यात आली बँड स्पर्धेमध्ये…
*प्रथम क्रमांक* डॉन बॉस्को या शाळेने पटकावला
*द्वितीय क्रमांक* ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल
*तृतीय क्रमांक* शिवाई बालक मंदिर
यानंतर
*कब बुलबुल विभागाचे सामूहिक नृत्य घेण्यात आले*.
त्यामध्ये
*प्रथम क्रमांक* शिवाई बालक मंदिर या शाळेने पटकावला. *द्वितीय क्रमांक* जे के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गणपती वंदना.
*तृतीय क्रमांक* जे के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल
*स्काऊट गाईड विभाग सामूहिक नृत्य घेण्यात आले.*
या स्पर्धेमध्ये
*प्रथम क्रमांक* ओमकार इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने पटकावला
*द्वितीय क्रमांक* रॉयल इंटरनॅशनल स्कूल
*तृतीय क्रमांक*
मंजुनाथ इंग्लिश मीडियम स्कूल
*प्रथम उत्तेजनार्थ* एस एच जोंधळे विद्यामंदिर गुजराती माध्यमिक विभाग आणि

द्वितीय उत्तेजनार्थ एस एच जोंधळे विद्यामंदिर इंग्लिश प्राथमिक विभाग या शाळेने पटकावला.
कब बुलबुल मेळाव्यासाठी एकूण चार शाळेच्या 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आजच्या कार्यक्रमासाठी एकूण 244 विद्यार्थी सहभागी झाले होते.
आजच्या या कार्यक्रमाचे नियोजन प्रकाश विद्यालय डोंबिवली पूर्व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती बारी मॅडम यांनी केले होते. खूप छान असे आयोजन करण्यात आले होते. सर्व शाळांनी उत्कृष्ट असे सामूहिक नृत्य सादर केले तसेच सर्व बँड स्पर्धकांनी उत्कृष्ट बँड वादन करून आपली कला सादर केली. त्याबद्दल सर्व विद्यार्थी शाळा, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शाळांचे स्काऊट मास्टर ,गाईड कॅप्टन यांचे *डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक आभार* या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागातर्फे अल्प उपहार व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम नेहमीप्रमाणे उत्कृष्ट झाला सर्व स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांनी खूप सहकार्य केले.
Back to top button
