कल्याण प्रतिनिधी, श्री. प्रवीण खाडे सर….
कल्याण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून तालुकास्तरीय
विज्ञान प्रदर्शन दि २९/१२/२०२५ व ३०/१२/२०२५ रोजी रॉयल इंटरनॅशनल स्कूल डोंबिवली पूर्व येथे आयोजित केले होते.
या तालकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये गणराज विद्यालयातील कु. आर्या यादव इयत्ता ७वी/अ आणि कु. परी प्रजापती इयत्ता ६वी/अ ( प्राथमिक विभाग) यांनी सादर केलेल्या स्मार्ट मॉडर्न होम मॉडेलला द्वितीय क्रमांक मिळाला. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. पंचायत समिती शिक्षण विभाग कल्याणच्या गटशिक्षणाधिकारी
मोटगरे मॅडम आणि विस्तार अधिकारी विद्या नाईकवाडी मॅडम यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांना श्री गणराज म्हात्रे व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.त्या विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.