महाराष्ट्र

राज्यात राष्ट्रवादीच्या मंत्र्याना, अटक करण्याच्या हालचाली सुरू, तर मंत्रीमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचा प्रयत्न..

भारतीय संघर्ष Live...

मुंबई/(प्रतिनिधी संपादक) भारतीय संघर्ष वृत्तसेवा..
राज्यात राष्ट्रवादीच्या काही मंत्र्याना, अटक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मंत्रीमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचा प्रयत्न चालला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या अटकेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, तर धनंजय मुंडेंची थेट दिल्ली गाठून भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. परत येण्यासाठी धनंजय मुंडे फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. महाराष्ट्रात राष्ट्रावादीच्या मंत्र्याच्या अटकेच्या हालचाली सुरु असताना धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठून भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रीमंडाळात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे सदनिका वाटपातील गैरव्यवहार अडचणीत सापडले आहेत. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने हीच शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे मंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे.
फडणवीस व अजितदादा भेटीची माहिती मिळाली आहे. माणिकराव कोकाटेंसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीत कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा सवाल मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना विचारला आहे. हायकोर्टाने स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रिपद वाचू शकते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचीही माहिती मिळाली आहे.
माणिकराव कोकाटे विरोधात वॅारंट निघाल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी हालचाली घडताना दिसत आहेत. मंत्रीमंडळात परत येण्यासाठी धनंजय मुंडे फिल्डिंग लावत असल्याचे समजत आहे. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत असताना धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठली आहे. धनंजय मुंडे यांनी संसदेत भाजप नेत्यांची भेट घेतल्याची स माहिती मिळाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंमधील संबंधामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून निलंबित करण्यात आले आहे.
मंत्री पद गेल्यापासून धनंजय मुंडे यांच्याकडे पक्षाने कोणतेही पद दिले नव्हते. धनंजय मुंडे यांचे जबाबदारी मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रायगडमधील जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी खुर्चीसाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. तटकरेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडेंनी जाहीरपणे तशी मागणी केली होती. काहीतर जबाबदारी द्या असे मुंडेंनी म्हटले होते. मात्र, यानंतरही पक्षाकडून तशा प्रकारच्या सकारात्म हालाचली झालेल्या नाहीत. यामुळे धनंजय मुंडे आता स्वतःच प्रयत्न करताना दिसत आहेत. राज्यात सध्या काही मंत्री भ्रष्टाचार प्रकरणामूळे अडचणीत आले आहेत, तर काही या भ्रष्टाचार प्रकरणात जेलमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहेत, त्यामूळे राज्यात सगळयाच राजकीय पक्षात नवीन हालचाली सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button