महाराष्ट्र

उत्तर मुंबईचे शिक्षण निरिक्षक मुश्ताक शेख ला बडतर्फ करून गुन्हे नोंदवा.. जनार्दन जंगले अध्यक्ष TDF

भारतीय संघर्ष Live.....

 

मुंबई वृत्तसेवा (प्रतिनिधी)

भारतीय संघर्ष …..

 2017 पासून चेंबूर मुंबई येथे शिक्षण निरिक्षक पदावर असलेल्या मुश्ताक शेख यांनी सर्व प्रकारचे गैरव्यवहार करून गुन्हेगारी स्वरूपाची अनेक कृत्ये करून अन्यायग्रस्त शिक्षक शिक्षकेतरांचा छळ केला आहे, पुराव्यासह तक्रारी करुनही,उच्च न्यायालयाचे अनेक आदेश असुनही वरिष्ठ अधिकारी कारवाई करीत नाही, आता तात्काळ कारवाई करुन मुश्ताक शेखला बडतर्फ करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी TDF मुंबईचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केली आहे.

माननीय मुंबई उच्च उच्च न्यायालयाचे अनेक आदेश असुनही मुश्ताक शेख यांनी 2016 मध्ये सेवानिवृत झालेले मुख्याध्यापक श्री चंद्रधर मिश्रा यांचे 5,00,331/- पाच लाख तीनशे तेहेतीस रुपये अडवून ठेवले आहेत,न्यायालयाने आदेश देऊनही ते पैसे देण्यासाठी मुश्ताक शेख टाळाटाळ करीत असून वयोवृद्ध चंद्रधर मिश्रा यांचा शारीरिक मानसीक व आर्थिक छळ सुरू ठेवला आहे.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय, घाटकोपर पूर्व या शाळेचे शिक्षक कर्मचाऱ्यांनी मुश्ताक शेख यांची आर्थिक मागणी पूर्ण न केल्याने त्यांच्यावर अन्याय केला, तर ज्यांनी आर्थिक मागणी पूर्ण केली त्यांचे पदांना नियमबाह्य मान्यता दिली, तसेच संस्थेचे बोगस ठराव मागवून गुन्हेगारी कृत्ये घडवून आणून सदर शाळा 40% वरून डायरेक्ट 100% अनुदानावर आणली, ह्या गंभीर प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेव लटपटे यांनी SIT कडे पुराव्यासह तक्रार केली आहे.

श्री मुश्ताक शेख याने व इतर सर्व अधिकाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालयाचे TDF हायकोर्ट PIL no 33241/2024 अन्वये दिनांक 21.07.2025 चे आदेशाचे उल्लंघन करून त्यांचेकडे प्रलंबित गंभीर प्रकरणी भ्रष्टाचार सुरू ठेवला आहे.

*मा प्रधान सचिव शालेय शिक्षण यांनी TDF सोबत दि.21.04.2025 रोजी घेतलेल्या सभेचे इतिवृत शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग व शिक्षण आयुक्तांना दिले व त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले त्यानंतर पुन्हा शालेय शिक्षण विभागाने 10.09.2025 रोजी शिक्षण आयुक्तांना दिलेले पत्र आणि शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांना दिले. पण दि.24.09.25 चे पत्र व 25.09.25 रोजीचा मेल नंतर ही आजपर्यंत शिक्षण संचालक माध्यमिक,मुंबईचे शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी श्री मुश्ताक शेख यांनी प्रधान सचिवांचे व शिक्षण आयुक्तांचे आदेशांचे पालन जाणीवपूर्वक केलेले नाही.

विधवा महिला शिक्षिका श्रीम जयश्री दडस यांना कुटुंब वेतन अदा करतांना श्री मुश्ताक शेख याने सतत दोन वर्षे त्यांचा व कुटुंबीयांची छळवणूक करून शारीरिक मानसीक आर्थिक छळ केला.

मुश्ताक शेख याने पुण्यात शिक्षणाधिकारी असताना बोगस शिक्षक भरती प्रकरणी यांच्यावर गुन्ह्या दाखल झाला होता, तसेच त्या कालावधीत त्यांनी अनेक बोगस तुकड्यांना मान्यता दिली होती, तसेच जाहिरात न देताही त्यांनी बेकायदेशीर शिक्षक भरती केली होती, तो गुन्हा प्रलंबित आहे.

*श्रीमती परवीन फातिमा इफ्तेखार गुलशन ए इस्लाम उर्दू हायस्कूल साकीनाका मुंबई या शाळेचे डी एड शिक्षिकेने बी ए , एम ए ची बोगस पदवी मिळवून शासनाची दिशाभुल करून बेकायदेशीर वेतन घेतले, तक्रार झाल्यावर श्री मुश्ताक शेख यांनी शहानिशा करून ती रक्कम शासनाचे तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले, त्यानंतर त्या शिक्षिकेने बेकायदेशीर वेतन शासनाला परत न करता मा उच्च न्यायालयात धाव घेतली,आणि तिने तक्रारदारांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यावर साकीनाका पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदविले होते,त्यानंतर परवीन फातिमा इफ्तेखार यांनी मा मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्र 7513(L) 2020 दाखल केली, ती न्यायालयाने फेटाळली. तरीही मुश्ताक शेख कारवाई करीत नाही*
*वैद्यकीय प्रतिपूर्ती घोटाळ्याचे मुख्य आरोपी व मुश्ताक शेख चा मित्र मणियार हुसेन खान मोहम्मद (सध्या मुख्याध्यापक गुलशन ए इस्लाम उर्दू हायस्कूल साकीनाका) याने लाखो रुपयांची खोटी वैद्यकीय बिले तयार केली, कामा हॉस्पिटल चे खोटे शिक्के बनवून खोट्या सह्या केल्या आणि बिले शिक्षण निरिक्षक मुंबई उत्तर विभाग चेंबूर या कार्यालयात सादर केली, ती बिले शिक्षण निरिक्षक सर्व श्री टी एम डोंगरे, अनिल साबळे, मुश्ताक शेख,श्रीमती उर्मिला पारधे, तसेच शिक्षण उपसंचालक डॉ बी बी चव्हाण, राजेंद्र अहिरे, संदीप संगवे यांचेकडे पुराव्यासह तक्रार केल्यावर त्यांनी दुर्लक्ष केले कारण हे सर्व त्या वैद्यकीय प्रतिपूर्ती घोटाळ्यात सहभागी होते, त्यामुळे मुश्ताक शेख, अनिल साबळे याने इतरांचे मदतीने निरपराध शिक्षक हमीद लालकोट व मोतीराम जंगम यांच्याविरुद्ध चेंबूर पोलीस ठाण्यात खोटा FIR केला. गंमत म्हणजे पोलिसांसमोर शिक्षण खात्याचे अधिकाऱ्यांनी साक्षीदार म्हणून खरा गुन्हेगार आरोपी मणियार हुसेन खान मोहम्मद याला उभा केला, या गंभीर प्रकरणी TDF मुंबईने 28.12.2022 रोजी शिक्षण आयुक्त व प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय यांना पुराव्यासह तक्रार केली, शिक्षण आयुक्तालयाने दि 29.12.22 रोजी शिक्षण उपसंचालक श्री सांगवे यांना चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल व अभिप्राय सादर करण्याचे आदेश दिले पण अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही. उलट मणियार हुसेन खान याला या सर्वांनी मुख्याध्यापक पदावर बसवले आहे*
*मुश्ताक शेख हा 2017- 18 पासून मुंबईच्या एकाच विभागात म्हणजे बृहन्मुंबई उत्तर विभाग चेंबूर मध्ये आहे, कारण मोठे रॅकेट त्याने बनवले आहे, त्याचा म्होरक्या असलेला भ्रष्ट, गुन्हेगार मणियार हुसेन या शिक्षकाला बेकायदेशीर मुख्याध्यापक बनविण्यात इतरांसह मुश्ताक शेख चा मोठा वाटा आहे, मणियार हुसेन खान हा शाळेत नोकरीला लागला तेव्हा तो अपंग नव्हता, पण अधिकारी खिशात असल्याने त्याने बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून जादाचे वेतन भत्ते गेले 17 वर्षे घेत आहे, तक्रार करणाऱ्याला तो धमकावतो, वैद्यकीय प्रतिपूर्ती घोटाळ्याचा तो सूत्रधार असून त्याने गुन्हा कबुल करून लुटलेले फक्त काही लाखो रुपये साळसूद पणे शिक्षण निरिक्षक कार्यालय चेंबूर ला परत केले, पण त्याच्यावर मुश्ताक शेख ने कारवाई केली नाही*
*शासनाचे आदेश न जुमानणारी के व्हि के शाळा धाटकोपर प चे मुख्याध्यापक व संस्था मुजोर बनली असून लॉक डाऊन काळात त्या शाळेने शाळा सुरू ठेवून मुलांचे जीव धोक्यात घातले होते तेव्हा मुश्ताक शेख ने कारवाई केली नाही शेवटी TDF ने आंदोलन केल्यावर पोलिसांनी परीक्षा बंद केली होती, सदर संस्था व मुख्याध्यापक मनमानी करून नेहमीच शिक्षकांचा छळ करते, मुश्ताक शेख त्यांना पाठीशी घालतो, म्हणून शासनाचे आदेशानुसार निवडणूक ड्युटीवर गेलेल्या शिक्षकांचे वेतन कापल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका यांना TDF ने पत्र दिले पण स्विकारले नाही,फोन केला, मेल केला, प्रधान सचिव व इतर वरिष्ठांचे आदेश असुनही दीड वर्ष मुस्ताक शेख गप्प बसून आहे*
*TDF मुंबई ने वाराणसी येथे जाऊन, मार खाऊन, मुंबईत आल्यावर भ्रष्ट शिक्षण खात्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी खोट्या केस मध्ये TDF कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबूनही पश्चिम विभाग मुंबईचे सुमारे 25 बोगस पदवीधर शोधले, त्यांचेवर गुन्हे दाखल झाले त्यांच्या नोकऱ्या गेल्या.पण उत्तर मुंबईतील शिक्षण निरिक्षक टी एम डोंगरे, अनिल साबळे,मुश्ताक शेख, उर्मिला पारधे यांनी बोगस पदवीधर बुलबुले व पटेल ह्या शिक्षकांकडून भरपूर पैसे घेऊन त्यांना अभय दिले, त्यांनी फक्त पत्रे दिली, हे सर्व अधिकाऱ्यांनी शासनाचे पैशांचा अपव्यय केला असून बोगस पदवीधरांना गेली 20 वर्षे पाठीशी घातले आहे, बोगस पदवीधरावर व मुश्ताक शेख सह सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी.
जर मुश्ताक शेख वर तत्काल कारवाई केली नाही तर TDF तर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button