भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क
हडपसर,पुणे/ (प्रतिनिधी)- हडपसरमधील चुकीचे उड्डाणपूल तत्कालीन सत्ताधारी नेते यांच्या आग्रहाखातर झालेले असताना आता मगरपट्टा आणि गाडीतळ येथील उड्डाणपुलाचेही पाडकाम करावे लागणार आहे. पण वस्तुस्थिती जाणून न घेता अजितदादांनी मात्र अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे.
पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटी रुपयांच्या ५३ विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन सोमवारी झाले.पन्नास वर्षांचा विचार करून शहराचे नियोजन करावे लागते. मात्र, ते चुकले की राज्यकर्त्यांना दोषी दिला जातो. अशाच चुका होत राहिल्या तर पुढील पिढी माफ करणार नाही,’ असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
शिक्षण घेतल्यामुळे अधिकाऱ्यांना तांत्रिक अक्कल असते. भैरोबानाला ते यवत या उड्डाणपुलासाठी मगरपट्टा येथील उड्डाणपूल पाडावा लागणार आहे. मगरपट्टा परिसरातील पूल असा केला आहे की, तो देशात कुठेही नसेल. गाडीतळ येथील पुलाचे बाॅलबेअरिंग खराब झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडावे लागतील. नवले पुलाबाबत तर बोलायलाच नको. नवले पुलावर उतार का आणि कसा केला, हे काहीच कळत नाही. अधिकारी निवृत्त होतात. सेवानिवृत्ती वेतन घेतात. मात्र, राज्यकर्त्यांना बोल ऐकून घ्यावे लागतात,’ असे पवार यांनी सांगतिले.