कल्याण प्रतिनिधी…
श्री. प्रविण खाडे सर
डोंबिवली येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ आयोजित कै. दत्ताराम लाड लेझीम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे दत्तनगर परिसरासह संपूर्ण संस्थेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या लेझीम स्पर्धेत ११ शाळांनी सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अप्रतिम आणि लयबद्ध सादरीकर
णातून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीमच्या आकर्षक फिरकण्या, अचूक ताल आणि शिस्तबद्धता पाहून परीक्षकांनीही त्यांचे विशेष कौतुक केले.स्पर्धेमध्ये शाळेला रोख बक्षीस आणि फिरतीढाल मिळाली. तसेच उत्कृष्ट ताशा वादक म्हणून इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पार्थ एकावडे याला देखील बक्षीस देण्यात आले यामध्ये एकूण ४५ विद्यार्थिनी आणि ७ वादक असा संघ सहभागी झाला होता. विद्यार्थ्यांचा सराव श्री लजपत जाधव सर यांनी शाळेजवळ असणाऱ्या केणे मैदान येथे घेतला.
या विजयामुळे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगरचे नाव सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अधिक उज्वल झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.
लेझीम पथकाला शारीरिक शिक्षण शिक्षक श्री.लजपत जाधव सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री. विकास हिवाळे सर यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना म्हटले की”आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ लेझीमचा उत्कृष्ट नमुनाच सादर केला नाही, तर त्यांनी आपल्या सांस्कृतिक वारशाचा मान राखला आहे. हा विजय आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”त्याचबरोबर शाळेच्या पर्यवेक्षिका सौ दौंड मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यवाह यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी देखील कौतुक केले.
या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेने स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणारी फिरती ढाल पटकावली व प्रमाणपत्र मिळवले.
Back to top button
