महाराष्ट्र
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयोजित शालेय लंगडी स्पर्धा संपन्न…
भारतीय संघर्ष न्यूज कल्याण...

कल्याण प्रतिनिधी…
प्रविण खाडे सर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रिडा विभाग आयोजित जिल्हास्तरीय शालेय लंगडी स्पर्धेचे आयोजन नेतिवली क्रीडांगण, कल्याण पूर्व येथे करण्यात आले होते.
कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनच्या नियोजनाखाली १९ वर्षाखालील मुले व मुली या गटातील शासनमान्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण १५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उदघाटन कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री अविनाश नलावडे व सचिव श्री प्रविण खाडे यांच्या उपस्थितीत झाले.यामध्ये मुलांच्या गटात विजेतेपद के व्ही पेंढारकर महाविद्यालयाच्या या संघाने तर उपविजेतेपद जे सी एस विद्यालय भाल या संघाने पटकावले त्याचबरोबर मुलींच्या गटात विजेतेपद जे सी एस विद्यालयाच्या संघाने तर उपविजेतेपद प्रगती विद्या मंदिर, भाल या संघाने पटकावले. या स्पर्धेत पंचप्रमुख म्हणून सुशांत सोनवणे याने काम पाहिले. दिपक माने, सुमित भुसारे, सुदर्शन पर्वत, दिपेश गायकवाड, तन्मय जाधव, इरफान शेख यांनी पंच म्हणून उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली. यावेळी श्री ठाकरे, श्री गिरीश केवणे, श्री ज्ञानेश्वर हरड,श्री भाऊसाहेब आंधळे, श्री शरद गोवारी हे क्रिडाशिक्षक उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक श्री रविंद्र वेंदे यांनी सदिच्छा भेट दिली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा विभागाचे क्रीडा पर्यवेक्षक श्री प्रविण कांबळे व महाराष्ट्र लंगडी असोसिएशनचे सचिव श्री चेतन पागावाड यांचे सहकार्य लाभले.
त्याचबरोबर कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.


