गेवराई, दि. ११ (प्रतिनिधी) ः-
दिव्यांग बांधवांच्या सन्मानार्थ आणि सक्षमीकरणासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि महायुती सरकारने मोठा निर्णय करून त्यांच्या अर्थ साहाय्यात १५०० रु हून वाढ करून दरमहा २५०० रु अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपणही गेवराई मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले आहे. कृष्णाई येथे आयोजित संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मंजुरी पत्राचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ३५ दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.
ko)
सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी गेवराई शहरातील कृष्णाई येथे तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, नायब तहसिलदार संजय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जयभवानी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन जगन्नाथ शिंदे, माजी सभापती कुमारराव ढाकणे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विठ्ठल पिराजी पर्हाड, दत्ता किसनराव येवले, रेणुका दत्ता काळे, अभिमान तात्यासाहेब डोंगरे, संजिवणी परमेश्वर डोंगरे, कचरु पोमा पवार, भागवत ज्ञानेश्वर सोळुंके, भानुदास संताराम खरात, चंद्रकलाबाई ज्ञानोबा घवाडे, नंदकिशोर सुदाम सिरसट, गोरख श्रीकृष्ण उबाळे, श्रीकृष्ण आश्रृबा येवले, विजय दत्तात्रय भोजगुडे, कैलास बाबुराव तौर, बाबासाहेब बाजीराव कोकाटे, भिमराव बळीराम कदम, भागवत अर्जुन मेघारे, गोपीनाथ दिलीप कदम, बंडु पुंडलिकराव मोरे, सालेबीन आबेद चाऊस, शेख मोहसिन शेख मतीन, हबीब राजमहंमद शेख, शेख रब्बानीबी हबीब, ऋषिकेश मुंजाबा गाडे, कोंडिराम जगन्नाथ गाडे, गणेश गुलाब गाडे, दत्ता लक्ष्मण गाडे, शफीक बाबु शेख, उद्धव मोहनराव जोगदंड, नारायण भिमराव मोघे, मयुर रामेश्वर कचरे, आशेक वामनराव खंडागळे, रख्माजी दगडु मांगडे, सोपान भिमराव आरबड, अक्षय बाबासाहेब रासणे आदी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले. या वेळी दिव्यांगांच्या वतीने गोरख उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आ. विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी बोलतांना अमरसिंह पंडित म्हणाले की, येणार्या काळामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातील एकही दिव्यांग बांधव रास्त योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ. दिव्यांग बांधवांसाठी गेवराई कार्यालयात वेगळा कक्ष सुरू करण्यात आला असून दर सोमवारी पात्र लाभार्थ्यांनी त्यांची कागदपत्रे या कार्यालयात जमा करावीत. दिव्यांग बांधवांना सन्मानपूर्वक ही सेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त करतांना या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देतांना कोणी पैशासाठी अडवणूक केली तर थेट मला फोन करण्याचे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. दिव्यांग बांधवांसाठी महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत करून उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांचे आभार मानले.
प्रास्तविक करतांना नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी शासकीय योजनांची माहिती देऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया बाबत सखोल माहिती दिली. उपस्थित दिव्यांग बांधवांनी यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आभार मानले.
यावेळी हनुमान कोकणे, सरपंच राधाकिसन चक्कर, परमेश्वर धायगुडे, विष्णूपंत घोंगडे, धोंडिराम डिंगरे, रवि निवारे, विष्णू हात्ते, काशिनाथ सपकाळ, अज्जु सौदागर, बळीराम शिंदे, दत्ता घवाडे, अशोक चव्हाण, उद्धव चव्हाण, तौफीक पठाण, अंकुश गायकवाड, रामदास मुंडे, मंगेश कांबळे, राजु पठाण, श्रीचंद सिरसट, गहिणीनाथ उगलमुगले, कृष्णा राऊत, लिंबाजी खोटे, शेख सुभान, प्रहारचे शेख राजु, सुखदेव माने, नजीर कुरेशी, बंडु डोंगरे, महेश ढेरे, आनंद सरपते, शिवाजी डोंगरे, प्रकाश भोले, सोमनाथ गिरगे, मुक्ताराम आव्हाड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
