महाराष्ट्र

गुटका ,सिगारेट,तंबाखू,दारू देऊन खेळ चालवणारे क्लब बंद करण्याचे पोलिस प्रशासना समोर आव्हान…

भारतीय संघर्ष न्यूज...

 

खेळ चालवणाऱ्यांची मुजोरी पोलिसांच्या हतबलतेमुळे वाढली..

गेवराई!विष्णु राठोड,

आमचे कोणीच काही करू शकत नाही,पेपर ला बातम्या आल्याने काय होते,बोभाटा करून चोर पकडले जातात का अशी मुजोरी भाषा चोरी करणारेच वापरू लागल्याने हा नियमानुसार दिसणारा अवैध खेळ पोलिस प्रशासन बंद करणार आहेत का? हे मोठे आव्हान पोलिसा समोर उभे असून पोलिसांच्या हतबलतेमुळे यांची मुजोरी वाढत चालली असल्याची जोरदार चर्चा आता होऊ लागली आहे.

आपला खेळ हा नियमानुसार आपण चालवत नाहीत हे माहित असून ही आमचे कोणीच काही करू शकत नाही,पेपर च्या बातम्या आल्याने काय फरक पडतो,जर पोलिस तपासनीस आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात अशी मग्रुरी ची भाषा आता कापण्यात येऊ लागली याला पोलिस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी कारणीभूत आहेत कारण यांनी जर वेळीच यांना आळा घातला असता तर यांची मग्रुरी वाढली नसती, क्लब चालवणारे आम्ही किती शाहू आहोत हे जरी दाखवत असले तरी या ठिकाणी अनियमितता दिसून येते.याठिकाणी येणाऱ्या सभासदांना गुटका,सिगारेट,तंबाखू तर काही सभासदाच्या मागणी वरुण दारू पुरवली जाते हे नियमात बसते का याचे उत्तर मग्रुरी भाषा करणाऱ्या चालकांनी द्यावे,हे सर्व याठिकाणी सुरू असल्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना माहीत असताना ही कार्यवाही होत नाही ही शोकांतिका असून प्रशासनाच्या हतबलतेमुळे यांची मुजोरी वाढली असल्याने पोलिस खात्याची प्रतिमा जण सामान्यात डागाळत चालली आहे याचे भान अधिकारी आणि कर्मचारी यांनी वळगणे गरजेचे आहे.समजता काय चालले हे दाखवण्याचे काम पत्रकार आणि नागरिक करतात मग पोलिस प्रशासन गप्प का असा सवाल जनता आता करू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button