कल्याण प्रतिनिधी, श्री. प्रवीण खाडे सर…….
होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल कल्याण पूर्व येथे शाळेतील स्काऊट आणि गाईड युनिटने इयत्ता ६ ते ८ वीतील विद्यार्थ्यांकरिता खरी कमाई महोत्सव आयोजित केला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खरी कमाई अंतर्गत व्यवहारात प्रत्यक्ष ज्ञानाचे आयोजन जीवनात व्हावे, याकरिता विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात लावले होते. एकूण दहा स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले, या कार्यक्रमाला कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. जगन्नाथ सपकाळे ,उपाध्यक्ष श्री बी एन भोसले, सचिव श्री. शशिकांत पाटील, ट्रेनिंग प्रवीण खाडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अश्वती नायर , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिया विंदाणे , पर्यवेक्षिका ईस्टर नाडर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनाने झाले, त्यानंतर श्री जगन्नाथ सपकाळे यांनी खरी कमाई बद्दल मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपाध्यक्षा अश्वती नायर मॅडम मुलांना खरी कमाईचे महत्व आपल्या दोन शब्दात समजून सांगितले. त्यानंतर श्री जगन्नाथ सपकाळे यांच्या शुभहस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचा सर्वांनी स्वाद घेतला. हा उपक्रम अध्यक्ष श्री.अर्जुन नायर सर, उपाध्यक्ष मिस अश्विती नायर मॅडम, खजिनदार सौ. मनीषा नायर मॅडम, मुख्याध्यापक मिस. अश्वती नायर मॅडम, सुपरवायझर सौ. ईस्टर नाडर मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. स्काऊट मास्टर श्री. शरद गवळी सर यांनी कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे नियोजन स्काउट मास्टर विजेता रहाटे यांनी केले.
Back to top button
