महाराष्ट्र ग्रामीण

जीवाचीवाडी येथील विविध संस्था ,शाळा, ग्रंथालय ध्वजवंदन साजरा…

भारतीय संघर्ष Live...

येवता प्रतिनिधी:(आप्पाराव सारूक)दि.२६केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील विविध संस्था,शाळा,ग्रंथालय,ध्वजवंदन साजरा युनानी दवाखाना,जीवाची वाडी येथील ध्वजवंदन सैनीक,सतीष चौरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आरोग्य कर्मचारी श्रीम.सुरेखा सानप व श्रीम.वर्षा गव्हाने उपस्थित होते. पशुवैद्यकीय दवाखाना येथील ध्वजावंदन संस्था प्रमुख शिध्देश्वर रासवे,यांच्या हस्ते संपन्न झाले कै.श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक ग्रामीण ग्रंथालय ध्वजावंदन मुखाधापक अंकुश मोराळे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी संस्थापक अध्यक्ष गोकुळ सारूक,ग्रंथपाल सुभाष सारूक,शोभाताई चौरे,वाचक, विधार्थी व ग्रामस्थ इत्यादी मोठ्या संखेने उपस्थित होते.जि.प.प्रा.शा.हनुमानवस्ती(जी)ध्वजावंदन मुख्याधापक,गोकुळ सारूक यांच्या हस्ते संपन्न झाले,यावेळी अंगणवाडी महिला कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. जि.प. उच्च प्राथमिक शाळा जिवाचीवाडी ध्वजावंदन सेनीक सतीश चौरे यांच्या हस्ते संपन्न झाले शाळेतील विविध कलागुण विद्यार्थ्यांनी पालकांसमोर सादर केल्याने सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालय जीवाची वाडी येथील ध्वजावंदनगावच्या प्रथम नागरीक तथा माहिला सरपंच श्रीम.प्रेरणा काळे  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी शालेय विद्यार्थी,अंगणवाडी महीला कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी,पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button