कल्याण प्रतिनिधी, श्री प्रवीण खाडे सर ..
शिक्षक घडविणा-या आयडियल डी एड महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला.
दि. २५/१२/२०२५ ते ३०/१२/२०२५ दरम्यान आयडियल कॉलेज कॅम्पस भाल मैदानात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य.सी.पी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शिक्षिका सौ.मंगल कदम,सौ.सुरभी सिंग,लिपिक अरविंद भोळे,व डी.एडचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी कबड्डी,खो – खो,बॅडमिंटन,क्रिकेट, लांबउडी,धावणे,डाॅजबॉल,थाळीफेक,गोळाफेक,रस्सीखेच अशा विविध मैदानी खेळात उत्स्फूर्तपणे भाग घेतला व आनंद लुटला.