महाराष्ट्र

आमदारपदाची वर्षपूर्ती आणि भाजपा कार्यकर्ता मेळावा संपन्न …

भारतीय संघर्ष न्यूज Live...

 

 पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी,

गेल्या वर्षी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली. याच आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने वर्षपूर्ती सोहळा व भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून मन भावूक झाले. कारण २००७ पासून आजपर्यंत राजकारणात जे काही साध्य झाले, ते फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच शक्य झाले आहे. संघर्षाच्या प्रत्येक क्षणी कार्यकर्ते माझ्यासोबत उभे राहिले, म्हणूनच आज हा टप्पा गाठता आला, ही भावना यावेळी व्यक्त केली.

या सोबतच कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ‘अब की बार १०० पार’ हे लक्ष डोळ्यांसमोर ठेवून आपण सर्वांनी अधिक एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा संकल्प केला. यावेळी पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने आमदारकीची वर्षपूर्ती झाल्याबद्दल माझा सन्मान करण्यात आला. या सन्मानाचा स्वीकार करत पुढील वर्षी याच व्यासपीठावर महापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांच्या वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

खरंतर चिंचवडच्या विकासासाठी मागील वर्षभरात रस्ते, वाहतूक कोंडीवरील उपाययोजना, नदी सुधार प्रकल्प, आरक्षित जागांवरील अधिकार, अतिरिक्त पाणी साठा, तसेच ‘आमदार आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमातून हजारो नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम सातत्याने केले. हा प्रवास माझा एकट्याचा नसून आपण सर्वांचा आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरात केला आहे आणि यापुढेही निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button