महाराष्ट्र

प्रभारी अधिकारी राजेश गडवे हे वाळूमाफिया व अवैध धंदयासाठी ठरत आहेत कर्दनकाळ :

भारतीय संघर्ष live....

________________
प्रभारी अधिकारी राजेश गडवे यांचा वाळू माफियांना चौथा दणका :

चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये
 गायकवाडजवळगाव येथील नदीतून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पकडला;

गेवराई!विष्णु राठोड,

दि .१० सपोनि राजशे गडवे व त्यांचे सहकारी उमापुर हद्दीत गस्त घालत असतांना मौजे गायकवाड जळगाव येथील नदीतून वेळ17.00 वा वाळू भरून टॅक्टर जळगाव फाटयाकडे जात असल्याची माहिती मिळताच प्रभारी सपोनि राजेश गडवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाळूच्या टॅक्टर चा पाठलाग करून ट्रॅक्टर पकडला .
यामध्ये सपोनि राजेश गडवे त्यांचे सहकारी पोउपनि पानपाटील साहेब , चालक सुरवसे, पोअं घोंगडे, पोह घनशाम केदार यांनी मोठी कारवाई केली , या कारवाईत विनापरवाना वाळू वाहतूक करणारा टॅक्टर पकडून , पोह घनशाम केदार यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करून, टॅक्टर वर गुन्हा दाखल करून आकरा लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.सपोनि गडवे यांच्या आदेशाने पुढील तपासासाठी एन .पी.सी गुजर यांच्याकडे देण्यात आला आहे .
वाळू माफियांना गडवे यांनी चौथा दणका दिला आहे .
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून एपीआय राजेश गडवे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार घेतच दोन नंबर वाल्यांना दणका दिला आहे,एक पाठोपाठ धडक चार कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने तालुक्यात या कारवाईचे कौतुक होत आहे.पदभार घेतच धडक कारवाईला सुरुवात करून राजेश गडवे यांनी आपल्या कार्याची तत्परता दाखवून दिली.
दिनांक 10 रोजी उपविभागीय पेट्रोलिंग दरम्यान गायकवाड जळगाव या गावात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसताच पोलिसांनी जळगाव येथील सरकारी दवाखान्याजवळ टॅक्टर पकडला यावेळी सपोनि गडवे आणि त्यांचे सहकारी व गावातील दोन पंच यांच्या समक्ष स्पॉट पंचनामा करत ट्रॅक्टर जप्त केले.ही कार्यवाही केल्याने वाळू माफियांना चांगलाच दणका बसला असून एपीआय राजेश गडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक
चकलांबा ग्रामस्थांकडून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button