महाराष्ट्र

कान्हादेश (खान्देश )मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे मेळावा उत्साहात संपन्न.

भारतीय संघर्ष live..

उरण प्रतिनिधी ,

उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याचा भाग खान्देश म्हणून ओळखला जातो. खान्देश हा महाराष्ट्राचा अविभाज्य व महत्त्वाचा भाग आहे आज खान्देशातील नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र व महाराष्ट्र बाहेर तसेच देश विदेशात नोकरी व्यवसाय धंद्या निमित्त मोठया प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. देशाच्या विकासात आजपर्यंत खान्देश मधील नागरिकांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. खान्देश मधील नागरिक रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई परिसरात नोकरीत धंद्या निमित्त मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. विविध ठिकाणी विखुरलेल्या खान्देश मधील नागरिकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने तसेच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन खान्देश नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचा उद्देशाने कान्हादेश (खान्देश )मित्र मंडळ ची स्थापना झाली असून विविध नागरिकांची एकमेकांना ओळख व्हावी, खान्देश मधील संस्कृती, आचार विचाराचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून कान्हादेश (खान्देश )मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे रविवार दिनांक 24 /8/2025 रोजी उरण तालुक्यातील करंजा रोड वरील भारती बॅंक्वेट हॉल येथे खान्देश मधील नागरिक जे रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहेत अशा नागरिकांचा मेळावा स्नेहभोजन कार्यक्रम व सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साह संपन्न झाले.

सकाळी ९ ते १० सत्यनारायण पूजा, सकाळी १० ते १२ नृत्य गायन वकृत्व स्पर्धा,दुपारी १२ ते २ या वेळेत सहभोजन आदी विविध सांस्कृतिक धार्मिक सामाजिक उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.या मेळाव्याला व विविध कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.लहास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलाबराव जाधव,नवजिवन लोक विकास संस्थाचे अध्यक्ष किशोर पाटील,मराठा सेवा संघ कल्याण उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले,हिंदी व मराठी गाण्यांचे गायक विनोद चोधरी बेलापूर,आरोग्य सेवा भिवंडीचे अध्यक्ष कैलास पाटील, खान्देश मित्र मंडळ ठाणेचे उपाध्यक्ष शांताराम पाटील, ठाणे जिल्ह्याचे उद्योजक विकास पाटील,डॉक्टर चेतन पाटील पनवेल आदी प्रतिष्ठित मान्यवरांनी या मेळाव्यास भेट दिली. त्यांनी सदर मेळावा व उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सर्व पदाधिकारी सदस्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कान्हादेश (खान्देश )मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चित्ते,कार्याध्यक्ष सुनील चौधरी,उपाध्यक्ष आनंद कुमावत, उपाध्यक्ष कैलास भामरे,खजिनदार वामन राठोड, सह खजिनदार संजय पाटील, सेक्रेटरी सचिन खैरनार, कार्याध्यक्ष डॉक्टर विजय देवरे,सह खजिनदार भरत पाटील, सह सेक्रेटरी ईश्वर माळी,सह सेक्रेटरी संदीप पाटील, सदस्य भगवान राठोड यांच्यासह सर्वच पदाधिकारी सदस्यांनी हा मेळावा व विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी नागरिकांनी विविध कार्यक्रम उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.या कार्यक्रमातून खानदेश संस्कृतीचा आचार विचारांची ओळख सर्वांना झाली असून मेळावा व इतर कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन केल्याने असा उपक्रम दरवर्षी राबविण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी आयोजकांकडे केली.व चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.एकंदरीत कान्हादेश (खान्देश )मित्र मंडळ आयोजित मेळावा व इतर कार्यक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button