गेवराई प्रतिनिधी…
गेवराई दि.१८ (प्रतिनिधी) :- गेवराई येथील दलित महिला व दलित समाज बांधव हे गेल्या ४० ते ४५ वर्षापासून गायरान शेतजमीन कसत असून त्यांच्या एकीला नोंदी आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांची सातबारा उताऱ्यावर मालकी हक्कात नोंद झालेली नाही. हि गायरान शेतजमीन नावावर करावी यासाठी अतिक्रमण धारकांनी गेल्या दहा दिवसांपासून गेवराईत साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांची मागणी रास्त असताना शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. भूमीहीन गायरान एकता आंदोलनाच्या वतीने गायरान धारकांचे गेवराईत साखळी उपोषण सुरू आहे. यामध्ये वयोवृद्ध महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे. साखळी उपोषणाला दहा दिवस झाले असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. गायरान शेतजमीन त्यांच्या नावे करावी हि आंदोलन धारकांची प्रमुख मागणी आहे. परंतु झोपेचं सोंग घेतलेले अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार असा आक्रमक पवित्रा गायरानधारक वयोवृद्ध महिलांनी घेतला आहे. या आंदोलनस